केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास नागपुरात आज (ता.१२) सुरूवात झाली. यशवंत स्टेडियम येथे या महोत्सवाचे अभिनेत्री तथा खासदार कंगना राणावत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आजपासून 2 फेब्रुवारी पर्यंत हा क्रीडा महोत्सवास होणार असून यात जवळपास 80 हजार खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut : मुख्य आका आपल्या जवळ ठेवायचा अन् खालच्या लोकांवर कारवाई केली जातेय : संजय राऊतमुख्यमंत्री तथा गृहमंत्री वारंवार म्हणतात मी कोणाला सोडणार नाही. पण त्यांनी मुख्य आरोपीच मोका कायद्यातून बाहेर सोडला. अशीच राज्य करण्याची भाजपची पद्धत आहे. मुख्य आका आपल्या जवळ ठेवायचा आणि त्याच्या खालच्या लोकांवर कारवाई करायची.
Sanjay Raut : सरकार वाल्मिक कराड वाचवण्याचे काम करतयं? : संजय राऊतसरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात काही लोकांवर मोका लावण्यात आला पण वाल्मिक कराड याच्यावर मोका लावण्यात आला नाही. यावरून आता वाद उफाळला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असून ते आपल्या वाक्याप्रमाणे वागत नसल्याचे म्हटले आहे. तसेच ते वाल्मिक कराड याला वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे.
Sanjay Raut : आघाडी तुटली असे मी म्हणालो नाही : संजय राऊतइंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असे मी म्हणालो नाही. काँग्रेसच्या नेत्यांना ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमुळे पक्ष मजबूत होतो. यामुळे स्वबळाचा नारा देण्याची पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी होती.
BJP Adhiveshan Shirdi : आम्ही जनतेची सेवा करू : भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणभाजपचे नवनियुक्त महाराष्ट्र कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, यांनी आपल्या नियुक्तीवरून प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी, कालच माझी कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. कालच मी साईबाबांचे दर्शनही घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेची सेवा करू. आपण सर्वजण समन्वयाने एकत्र काम करू. वरिष्ठ नेतृत्वाने आणि सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन.
स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकांसाठी तयार राहा म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणशिंग फुंकले. विधानसभेच्या निवडणुकांचे युद्ध जिंकलं असलं, तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. तसेच त्यांनी, भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांना कानमंत्र दिला.
BJP : भाजप संघटनात्मक बांधणीसाठी 'भाकरी' फिरवणार; भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना पक्षात बढतीमहापालिका निवडणुकानंतर भाजप संघटनात्मक बांधणीसाठी 'भाकरी' फिरवणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. याचवेळी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना पक्षात बढती देण्यात आली आहे. चव्हाण यांची भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
Chandrashekhar Bawankule : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणारस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच अध्यक्षतेखाली होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्री बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट केले.
Chennai Express : सोलापुरात मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसवर दगडफेकसोलापूरमध्ये मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत ट्रेनच्या काचा फुटल्या असून एक प्रवासी जखमी झाला आहे. ही दगडफेक पारेवाडी - वाशिंबे दरम्यान करण्यात आली आहे. धावत्या रेल्वेववर दगडफेक करण्याची ही १० दिवसांतली दुसरी घटना असल्याने आता आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक, आंदोलनाची तयारीसरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अद्यापही एका आरोपीची अटक झालेली नाही. या प्रकरणात तपास यंत्रणांना यश आलेले नाही. त्यामुळे मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक झाले असून आज (ता.12) याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान याआधी देखील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
Beed Accident : राखेची वाहतूक करणाऱ्याने सरपंचाला उडवलेबीडसह राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने संताप व्यक्त केला जात असतानाच सौंदाना गावच्या सरपंचाचा मृत्यू झाला आहे. तर राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाने त्यांना उडवल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव अभिमन्यू क्षीरसागर असे असून मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला
Ajit Pawar's NCP : उद्धव ठाकरेंप्रमाणेच महायुतीतील एका पक्षाचा स्वबळाचा नारा? बड्या नेत्याच्या विधानानं खळबळउद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. आता स्वबळाचे वारे महायुतीत देखील वाहताना दिसत आहेत. महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत पक्षातील जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी तसे वक्तव्य केलं आहे.
BJP Convention Shirdi: जे. पी. नड्डा व फडणवीसांच्या उपस्थितीत उद्धघाटनभाजपच्या शिर्डीतील महाविजय अधिवेशनाला आज सकाळी नऊ वाजता प्रारंभ होत आहे, या अधिवेशनाची ‘श्रध्दा, सबुरी अन् भाजपची महाभरारी’ अशी टॅग लाईन आहे. फडणवीसांची अजोड कामगिरी आणि ही टॅग लाईन हे या महाविजय अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यानिमित्ताने साईंची शिर्डी गजबजून गेली आहे. शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता अधिवेशनाचे उद्धघाटन होणार आहे.
vijay kumar special police commissioner:दिल्लीच्या विशेष पोलीस आयुक्तपदी विजय कुमार यांची नियुक्तीजम्मू-काश्मीरचे आतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांची दिल्लीच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्तीसगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये विजय कुमार यांनी अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय कुमार यांच्या नियुक्ती महत्वाची मानली जाते.
Santosh Deshmukh Murder Investigation: वाल्मिक कराड याला मोक्कातून वगळल्याने देशमुख कुटुंबियांनी नाराजीमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. यातील सर्व आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबधीत असलेल्या वाल्मिक कराड याला मोक्का लावण्यात आलेला नाही, त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. देशमुख कुटुंबीयांसह भाजप आमदार सुरेश धस यांनी कराडला मोका आणि ३०२ लावण्याची मागणी केली आहे.
BJP Convention Shirdi Live: राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अधिवेशनाची जबाबदारीभाजपचे महाअधिवेशन आज शिर्डीत होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्यातील दिग्गज नेते तसेच मंत्री व आमदार अधिवेशनानिमित्त शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. भाजपचे हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियोजनाची जबाबदारी स्वीकारली असल्यामुळे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील गेल्या काही दिवसापासून अधिवेशनाची जय्यत तयारी करीत आहेत. अधिवेशनासाठी 15 हजार भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमून या ठिकाणी विचारांचे मंथन करणार आहेत.