येत्या काळात पुणे ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येणार असून उद्याोजक, कंपन्या पुण्यात आकर्षित होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘सेमीकंडक्टर मिशन’ अंतर्गत रांजणगाव येथे प्रस्तावित इलेक्ट्रॉनिक उत्पादन संकुलाचे (मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर) काम येत्या दीड वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली.
स्टोरियन एचके’ आणि ‘आयएफबी’ या दोन मोठ्या कंपन्यांकडून या संकुलाची उभारणी सुरू असून येत्या काळात ५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात येईल. सेमीकंडक्टरशी निगडित विविध प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. शिवाय देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढेल असं ही ते म्हणाले.
Pune : विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेला ३८ लाख रुपयांना गंडापीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये महिलेने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपीने महिलेला उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याची बतावणी केली. यानंतर आरोपीने महिलेची भेट घेतली. पिडीत महिलेला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर बलात्कार केला.
आपल्याला जमीन खरेदीसाठी पैसे लागणार असल्याचे सांगत त्याने तिच्याकडून तब्बल ३८ लाख रुपये उकळले. महिलेने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली
गावरान टोमॅटोच्या लागवडी मधून शेतकरी घेतोय लाखो रुपयांचे उत्पादनमावळ तालुक्यात सध्या रब्बी पिके आणि भाजीपाला ची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. शेतातील भात काढून झाल्यावर अनेक शेतकरी आता भाजी लागवड करू लागले आहेत. मावळच्या कासारसाई मधील शेतकरी सुनील किरवे यांनी केवळ एक एकर क्षेत्रात साहो जातीच्या गावरान टोमॅटो ची लागवड केली. मात्र यातून आता त्यांना लाखो रुपयांचा नफा होऊ लागला आहे.
रामोशी बेडर समाजाचे वार्षिक अधिवेशन...सांगोला येथे राज्यातील रामोशी बेडर समाजाला संघटीत करण्यासाठी स्थापन केलेल्या जय मल्हार संघटनेचे वार्षिक अधिवेशन राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या उपस्थितीत पार पडले. अधिवेशनात आगामी काळात रामोशी,बेडर यासह बारा बलुतेदारांना एकात्रित करून त्यांना राजकीय समाजिक न्याय मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समाजाला स्थान मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहे.
सांगोल्यात संमीश्र पालेभाजी शेतीचा प्रयोग यशस्वीदुष्काळी सांगोला तालुक्यातील अकोला गावातील दिनेश खटकाळे या तरूण शेतकर्याने संमिश्र पालेभाज्या आणि फळ लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. संमिश्र पिक लागवड शेती त्यांना फायद्याची ठरली आहे.
तीन एकर शेतीवर त्यांनी 35 प्रकारच्या विविध पालेभाज्या आणि 40 प्रकारच्या विविध फळ झाडांची लागवड केली आहे. याबरोबरच त्यांनी फळ बागेत अंतर्गत पिक म्हणून मसाल्याची लागवड केली आहे.
सेंद्रिय पध्दतीने पिकविलेल्या पालेभाज्यांना बाजारात मोठी मागणी वाढली आहे. शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली आहे. त्यामुळे शेतीतून मिळणार्या वार्षिक उत्पन्नात दुप्पट वाढ झाली आहे.
Maharashtra Live Update : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज रायगड दौऱ्यावरविधानसभेतील विरोधी पक्षनेते रायगड जिल्हयाच्या दौरयावर आहेत. सकाळी ते किल्ले रायगडाला भेट देवून छत्रपती शिवरायाना अभिवादन करतील. रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे जे काम प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे.त्याची अधिकारयांकडून माहिती घेतील. पाचाड इथं जिजाऊ समाधी दर्शन, चवदार तळयाला भेट दिल्यानंतर ते दरडग्रस्त तळीये गावाला भेट देणार आहेत. ते सुरू असलेल्या पुनर्वसनाच्या कामाची ते पाहणी करतील या विषयावर ते ग्रामस्थ आणि अधिकारयांशी चर्चा करणार आहेत.
बंधा-याचे 44 लाख रुपये पाण्यातगावाला मुबलक पाणी मिळावं यासाठी रत्नागिरीतील चिंद्रवली गावात वर्षभरापूर्वी सतीचा प-या याठिकाणी वळण बंधारा बांधण्यात आला.मात्र या बंधा-यात पाणीच साचत नसल्यानं गावावर पाणी भिषण टंचाईची टांगती तलवार उद्भवणार आहे.कच्चा बंधारा असताना गावाला पाणी पुरवठा होत होता मात्र चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या पक्क्या बंधा-यात पाण्याची साठवणूक होत नाही.याच पाण्यावर भाजीपाला करणा-या शेतक-यांना देखील शेतीसाठी मुबलक पाणी मिळेत नाही त्यामुळे बंधा-यासाठी खर्ची झालेले शासनाचे 44 लाख रुपये पाण्यात गेलेत.
Crime : भुसावळ खूनप्रकरणी पाच जणांना अटक गावठी पिस्तूलसह जिवंत काडतूस हस्तगतजळगाव दोन दिवसांपूर्वी भुसावळ येथे झालेल्या तेहरीम अहमद नासीर अहमद भुसावळ या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर, इतर दोनजण ताब्यात असून, त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.
भुसावळ येथे १० जानेवारी रोजी या तरुणाचा खून करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून कट रचून हा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कटात सहभागी संशयित यांना पोलिसांनी बल्लारशाह येथून अटक केली