बदलीनंतर IAS आणि IPS अधिकाऱ्यांना मिळतात या सुविधा, काय असतात बदलीचे नियम
GH News January 15, 2025 06:15 PM

IAS IPS Transfer : देशभरातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा बदली अनेक कारणांनी होत असते. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची बदली सर्वसाधारणपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असते. कोणत्याही आयएएस आणि आयपीएस यांच्या बदल्या अधिकाऱ्यांची कामगिरी, त्यांची तप्तरता आणि प्रशासकीय कारणांनी केली जाते. एखादी बदली झाली तर त्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागते..

आयएएस आणि आयपीएसच्या बदल्या

आयएएस आणि आयपीएस यांच्या बदल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशांनी केल्या जातात. अधिकाऱ्याची बदली एक नियमित प्रक्रिया आहे.कोणताही अधिकारी यात काही हस्तक्षेप करु शकत नाही. आयएएस आणि आयपीएस बदल्या विभागीय नियम आणि दिशानिर्देशानुसार होते. नियमांप्रमाणे बदल्यावेळी अधिकाऱ्यांचा कार्यकाळ, त्यांची कामगिरी आणि त्यांचे कार्यक्षेत्रांच्या गरजांना ध्यानात घेऊन बदली केली जाते. केंद्र सरकारकडे या संदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरिय विशेष समिती असते, ती अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात निर्णय घेते.

बदल्यानंतर काय सुविधा असतात ? –

जेव्हा कोणत्याही IAS आणि IPS अधिकाऱ्यांची बदली होते. तेव्हा त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. ज्यात प्रामुख्याने निवासस्थान, वाहन, ड्रायव्हर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश असतो.

• IAS-IPS अधिकाऱ्यांना बदलीनंतर लगेज दुसरीकडे नेण्याचा खर्च देखील सरकार करते.

• नवीन जागी पोस्टींग मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांना नवीन बंगला दिला जातो. निवास वाटपाच्या प्रक्रीयेस जर उशीर झाला तर त्यांच्या निवासाची व्यवस्था सरकारी गेस्ट हाऊसमध्ये केली जाते.

IAS आणि IPS अधिकाऱ्यांना त्यांच्या आधीच्या पोस्टींगच्या त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो.

• याशिवाय बदलीच्या वेळी IAS आणि IPS अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना बदलीच्या ठिकाणी जाण्याचे संपूर्ण भाडे सरकार देते.

• सरकारी निवासस्थानातील सर्व आवश्यक वस्तूंचा खर्च देखील सरकारच उचलते.

• बदलीनंतर नवीन जागी रुजू होताना कार्यभार ग्रहण करताच अधिकाऱ्यांना कार आणि ड्रायव्हरची सुविधा सरकार देते.

केव्हा होते बदली –

कोणत्याही वेळी कोणत्याही IAS आणि IPS अधिकाऱ्यांची बदली करण्याचा हक्क राज्य सरकार आणि केंद्र सरकारला असतो. परंतू कोणत्याही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची बदली अनेक कारणांनी होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या अधिकाऱ्याची कामगिरी चांगली नसेल तर त्याला दुसरीकडे बदली केले जाते. त्याशिवाय प्रशासकीय बाब म्हणून अधिकाऱ्यांना विविध क्षेत्राचा अनुभव येण्यासाठी त्यांची बदली केली जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.