मार्केट कॅपच्या बाबतीत जगातील टॉप बँकांमध्ये तीन भारतीय बँका, ह्या आहेत सर्वात माेठ्या २५ बँका
ET Marathi January 16, 2025 12:45 PM
मुंबई : अलिकडच्या काळात बँकांच्या स्थिरतेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक सहकारी बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. कामकाजातील अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच काही बँकांवर कठोर कारवाई केली आहे. तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित बँकांची माहिती घेणे आवश्यक आहे. या बँका दिवाळखोरीत निघण्याची भीती नाही. जगातील सर्वाधिक बाजार भांडवल असलेल्या टॉप २५ बँकांमध्ये भारतातील तीन बँकांचा समावेश झाला आहे. भारतातील एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांनी जगातील सर्वाधिक बाजार भांडवल असलेल्या टॉप २५ बँकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या बँकांचे मार्केट कॅप डेटा अॅनालिटिक्स आणि रिसर्च कंपनी ग्लोबलडेटाच्या अहवालानुसार, एचडीएफसी बँकेने जगातील टॉप २५ मार्केट कॅप बँकांमध्ये १३ वे स्थान मिळवले आहे. याशिवाय, आयसीआयसीआय बँक १९ व्या स्थानावर आणि एसबीआय २४ व्या स्थानावर आहे. २०२३ च्या चौथ्या तिमाहीच्या (ऑक्टोबर-डिसेंबर) अखेर, एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप १५८.५ अब्ज डाॅलर, आयसीआयसीआय बँकेचे १०५.७ अब्ज डाॅलर आणि एसबीआयचे ८२.९ अब्ज डाॅलर होते. भारतीय बँका मजबूत स्थितीत अहवालात म्हटले की या भारतीय बँका मजबूत स्थितीत आहेत. जानेवारी-डिसेंबर २०२४ या कालावधीत आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल वार्षिक आधारावर २५.८ टक्क्यांनी वाढून १०५.७ अब्ज डॉलर्सवर पोहोचले. याच कालावधीत, एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल वार्षिक आधारावर १.६ टक्क्यांनी वाढून १५८.५ अब्ज डॉलर्सवर पोहोचले. अहवालानुसार, जेपी मॉर्गन चेस ही जगातील सर्वाधिक बाजार भांडवल असलेली बँक बनली आहे. या यादीत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेचाही समावेश आहे. जगातील टॉप २५ बँका- जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी- बँक ऑफ अमेरिका कॉर्पोरेशन- आयसीबीसी- कृषी बँक ऑफ चायना- वेल्स फार्गो- बँक ऑफ चायना- चायना कन्स्ट्रक्शन बँक- मॉर्गन स्टॅनली- गोल्डमन सॅक्स- एचएसबीसी होल्डिंग्ज- रॉयल बँक ऑफ कॅनडा- कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया- एचडीएफसी बँक- मित्सुबिशी यूएफजे-चार्ल्स श्वाब- चायना मर्चंट्स बँक- सिटीग्रुप- यूबीएस ग्रुप- आयसीआयसीआय बँक- अल राजी बँकिंग अँड इन्वेस्टमेंट्स- सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुप- टीडी बँक- डीबीएस ग्रुप- स्टेट बँक ऑफ इंडिया- पीएनसी फायनान्शियल सर्व्हिसेस
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.