पहाटेच्या वेळी अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला केल्याने बॉलिवूड हादरलं आहे. अली सैफ अली याच्यावर झालेल्या हल्लाचा चित्रपट, राजकीय, सामाजिक क्षेत्रातून निषेध व्यक्त केला जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे, त्यानंतर ठाकरे सेनेच्या प्रवक्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे. प्रियंका चतुर्वेदींनी त्यांच्या X हॅण्डलवरुन याबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.
"मुंबईत सेलिब्रिटीही सुरक्षित नसतील तर मग कोण सुरक्षित आहे?" असा सवाल प्रियंका यांनी उपस्थित केला आहे. "बाबा सिद्दीकींचं कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहत आहे. बाबा सिद्दीकींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सलमान खानला बुलेटप्रूफ घरात रहावं लागत आहे. आता सैफ अली खानवर हल्ला झाला," असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. "हे सारं वांद्रा येथे घडलं आहे जिथे सर्वाधिक सेलिब्रिटी राहतात. या अशा परिसरामध्ये पुरेश्या प्रमाणात सुरक्षा असणं अपेक्षित आहे," असा उल्लेखही प्रियंका चतुर्वेदींनी केलं आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)