बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरामध्ये चोर घुसला होता. या चोराला पकडत असताना सैफवर त्याने चाकू हल्ला केला. चोराने पाच ते सहा वेळा त्याच्यावर वार केले. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सैफच्या घरामध्ये मध्यरात्री चोरीचा आणि हल्ल्याचा थरार कसा घडला याची माहिती समोर आली आहे.
च्या घरामध्ये चोरीच्या उद्देशने चोर शिरला होता. या चोराने सैफवर वार केले. मध्यरात्री हा थरार घडला. चोरीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला होता. रात्री दीड वाजता करीना कपूर घरी आली. करीनाला तिची बहीण करिश्मा कपूरने घरी सोडले. करीना घरी आल्यानंतर सर्वजण घरामध्ये झोपले होते. पहाटे सैफच्या मुलांसोबत झोपलेल्या मोलकरणीला चाहूल लागली. ती बाहेर आली. तेव्हा एक अज्ञात व्यक्ती घरात होती.
मोलकरणीने आरडाओरडा केला तेव्हा तिचा आवाज ऐकून सैफ बाहेर आला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने सैफवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामुळे सैफच्या उजव्या हातावर जखमा झाल्या. सैफने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला तर चोराने त्याच्यावर चाकूने पाच ते सहा वेळा वार केले. या हल्ल्यानंतर चोराने पळ काढला. त्यानंतर जखमी सैफला उपचारासाठी हलवण्यात आले.
घरामध्ये चोर घुसल्यानंतर तो आधी तैमूरच्या खोलीमध्ये शिरला. तैमूरसोबत नॅनी म्हणजेच मोलकरीन झोपली होती. चोराला मोलकरणीने पाहिले. चोराला पाहून ती जोरजोरात ओरडून लागली. चोराने वार करण्याचा प्रयत्न केला. तैमूर आणि जेहला काही होऊ नये यासाठी मोलकरणीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मोलकरणीने आरडाओरडा केल्याने चोराने तिच्यावर हल्ला केला. यामध्ये मोलकरणीच्या हाताला दुखापत झाली. ती जखमी झाली आहे.
मोलकरणीचा आवज ऐकून सैफला जाग आली आणि तो तैमूरच्या खोलीकडे धावला. सैफने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा चोराने त्याच्यावर देखील चाकू हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान चोराने सैफवर पाच ते सहा वेळा चाकू मारला. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून हात, मान आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. मानेवर १० सेंटिमीटरची जखम झाली आहे. हल्ल्यानंतर चोर पळून गेला. त्यानंतर जखमी झालेल्या सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.