क्रिकेट चाहत्यांना एका बाजूला आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत. पाकिस्तानकडे या चॅम्पियनशीप ट्रॉफीचं यजमानपद आहे. यजमान पाकिस्तान या स्पर्धेआधी विंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी तयार आहे. विंडीज पाकिस्तान दौऱ्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 17 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? कुठे पाहता येणार? हे सर्व काही सविस्तर जाणून घेऊयात.
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज पहिला कसोटी सामना हा 17 ते 21 जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज पहिला कसोटी मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज पहिल्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज पहिला कसोटी सामना टीव्हीवर भारतात दाखवण्यात येणार नाही.
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज पहिला कसोटी सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.
पाकिस्तान-विंडीज कसोटी मालिकेसाठी सज्ज
पाकिस्तान टीम : शान मसूद (कॅप्टन), बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, नोमान अली, साजिद खान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मोहम्मद अली, इमाम-उल-हक, रोहेल नझीर , मुहम्मद हुरैरा आणि काशिफ अली.
वेस्ट इंडिज टीम: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकाईल लुईस, केसी कार्टी, कावेम हॉज, ॲलिक अथानाझे, जस्टिन ग्रीव्हज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), अँडरसन फिलिप, केविन सिंक्लेअर, केमार रोच, जेडेन सील्स, गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, तेविन इमलाच आणि अमीर जांगू.