Latest Maharashtra News Updates : आज दुपारपासून परभणी ते मुंबई लाॅंगमार्च सुरु निघणार
esakal January 17, 2025 01:45 PM
Parabhani Live : आज दुपारपासून परभणी ते मुंबई लाॅंगमार्च सुरु निघणार

परभणी हिंसाचार प्रकरणी पोलिस कोठतीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळण्यासाठी आज दुपारपासून परभणी ते मुंबई लाॅंगमार्च सुरु निघणार आहे.

Dharashiv Live : वाघाला पकडण्यासाठी वनविभाग सज्ज

धाराशिवमधील येडशी अभयारण्यात फिरत असलेल्या वाघाला पडकण्यासाठी वन विभाग सज्ज झाला आहे.

Delhi Station LIVE : दाट धुक्यामुळे दिल्लीत विविध स्थानकांवरून निघणाऱ्या २७ गाड्या धावताहेत उशिराने

दाट धुक्यामुळे दिल्लीत विविध स्थानकांवरून निघणाऱ्या २७ गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Tender of Ankali-Chokak Road Cancelled : अंकली-चोकाक रस्त्याची निविदा रद्द

जयसिंगपूर/सांगली : नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मधील सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा रस्ता कित्येक वर्षांपासून रखडला आहे. आठ दिवसांपूर्वीच अंकली ते चोकाक आणि चोकाक ते सांगली फाटा या रस्त्यासाठी ६९६ कोटी रुपयांची निविदा अंतिम झाली होती. हैदराबादच्या श्री अवंतिका कॉन्टॅक्ट्रर्स लि. कंपनीने उणे ८.१४ दराने काम मिळवले होते; मात्र त्रुटींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ही निविदा रद्द करण्यात आली आहे.

MahaKumbh 2025 LIVE : पवित्र स्नानासाठी त्रिवेणी संगमच्या घाटांवर मोठ्या संख्येने जमले भाविक

प्रयागराज : त्रिवेणी संगमच्या घाटांवर मोठ्या संख्येने भाविक पवित्र स्नानासाठी जमलेले आहेत. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यासाठी आतापर्यंत ७ कोटींहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत.

Sanjay Shirsat LIVE : संजय शिरसाट यांना 'सिडको'च्या अध्यक्षपदावरून हटविले

मुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याचे मंत्रिपद भूषवत असतानाही ‘सिडको’ महामंडळाच्या अध्यक्षपदावरून स्वतःहून पायउतार न झाल्याने राज्य सरकारने अखेर शिरसाट यांना त्या पदावरून हटविले आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

Kolhapur News LIVE : सीमावासीयांचे आज कोल्हापुरात धरणे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आंदोलन

कोल्हापूर : सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज कोल्हापुरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात होणाऱ्या या आंदोनावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. सीमाप्रश्न १९५६ पासून प्रलंबित आहे. २००४ पासून सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असून, त्याला गती येणे आवश्यक आहे.

Shivaji University LIVE : शिवाजी विद्यापीठाचा आज दीक्षान्त समारंभ; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मंत्री चंद्रकांत पाटलांची राहणार उपस्थिती

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ आज, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात केंद्रीय पद्धतीने होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित असणार आहे. यंदा एकूण ५१ हजार ४९२ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे.

Hindenburg Research Company LIVE : अदानींना लक्ष्य करणाऱ्या हिंडेनबर्गला कुलूप, नॅटे अँडरसन यांची घोषणा

Latest Marathi Live Updates 17 January 2025 : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ आज सकाळी अकरा वाजता राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात केंद्रीय पद्धतीने होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आहेत. तसेच सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज कोल्हापुरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारी पूर्वी दिला जाणार आहे. भारतातील अदानी उद्योग समूहाप्रमाणेच परदेशातील बड्या वित्तीय संस्थांवर आर्थिक हेराफेरीचा आरोप करणाऱ्या अमेरिकेतील शॉर्टसेलर फर्म ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने आपले काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. या फर्मचे संस्थापक नॅटे अँडरसन यांनी याबाबतची घोषणा केली. संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आलीये. त्याचबरोबर राज्यात थंडीचा कडाका काहीसा कमी झालेला दिसत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.