U19 Womens T20 World Cup: टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज, पहिला सामना केव्हा?
GH News January 18, 2025 03:06 AM

अंडर 19 वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला 18 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. टीम इंडिया या स्पर्धेत निकी प्रसाद हीच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर मुंबईकर सानिका चाळके हीच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी आहेत. या 16 संघांना 4-4 नुसार 4 गटात विभागण्यात आले आहेत. अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याआधी 2023 साली पहिल्यांदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. टीम इंडियाने शफाली वर्मा हीच्या नेतृत्वात पहिलावहिला अंडर 19 महिला वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे गतविजेत्या टीम इंडियासमोर हा वर्ल्ड कप राखण्याचं आव्हान असणार आहे.

टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा?

टीम इंडियाचा या स्पर्धेत ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियासह ए ग्रुपमध्ये श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि मलेशियाचा समावेश आहे. टीम इंडिया अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात रविवार 19 जानेवारीपासून करणार आहे. टीम इंडियासमोर पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडीजचं आव्हान असणार आहे. त्यानंतर दुसरा सामना मंगळवारी 21 जानेवारीला यजमान मलेशियाविरुद्ध होणार आहे. तर टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 23 जानेवारीला होणार आहे.

सामने कुठे पाहायला मिळतील?

भारतात वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सर्व सामने हे मोबाईलवर जिओस्टारवर पाहायला मिळतील. तसेच या स्पर्धेतील सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

इंडिया विरुद्ध विंडीज, 19 जानेवारी, मलेशिया

इंडिया विरुद्ध मलेशिया, 21 जानेवारी, मलेशिया,

इंडिया विरुद्ध श्रीलंका, 23 जानेवारी, मलेशिया

वूमन्स अंडर 19 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम आणि वैष्णवी एस.

स्टँडबाय खेळाडू : नंदना एस, इरा जे आणि अनादी टी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.