Maharashtra Political News Live : सैफ अली खानच्या शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा काढला
Sarkarnama January 18, 2025 02:45 AM
Parbhani News : आंबेडकरी अनुयायांचा आज परभणी-मुंबई लाँग मार्च

पोलिसांच्या मारहाणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींवर कारवाई न झाल्यामुळे आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. कारवाई न झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ते आज परभणी ते मुंबई लाँग मार्च काढणार आहेत.

मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित - CM फडणवीस

अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर विरोधकांनी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कोणीच सुरक्षित नसल्याची टीका केली होती. विरोधकांच्या आरोपांवर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित असून काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाय या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Saif Ali Khan Live News : सैफच्या शरीरातून चाकूचा तुकडा काढला

अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी (ता.15) रात्री चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर सैफवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र, हल्लेखोराने सैफवर चाकूने 6 वार केले. यातील दोन जखमा गंभीर होत्या. तसंच त्याच्या शरीरातून सुमारे तीन इंचाचा चाकूचा तुकडा काढल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.