अभिनेता अमन जैस्वालचा रस्ते अपघातात मृत्यू
छोट्या पडद्यावरील अभिनेता अमन जैस्वालचा जोगेश्वरी येथे अपघाती मृत्यू
अमन शुटिंगला जात असताना त्याच्या बाईकला ट्रकने धडक दिली
17/1/2025 21:47:43
टोरेस घोटाळा प्रकरणी हवाला ऑपरेटरला अटक
अल्पेश खारा असे 54 वर्षीय आरोपीचे नाव
अल्पेश खाराला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
टोरेस घोटाळा प्रकरणी आतापर्यंत चौथी अटक
17/1/2025 18:46:3
लवकरच पालकमंत्री पदासंदर्भात आम्ही घोषणा करणार – देवेंद्र फडणवीस
बीड प्रकरणात कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडणार नाही
दिल्लीमध्ये भाजपा सरकार येणार
17/1/2025 18:24:19
अभिनेता रितेश देशमुख सैफ अली खानच्या भेटीसाठी लीलावती रुग्णालयात
17/1/2025 18:19:41
सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव आले समोर
भजनसिंह असे रिक्षा चालकाचे नाव असून त्याने सैफ अली खानला अवघ्या पाच ते सहा मिनिटात रुग्णालयात नेले
17/1/2025 16:51:56
आमदार सतीश चव्हाणांची शरद पवार गटाला सोडचिठ्ठी
18 जानेवारी रोजी शिर्डीत अजित पवार गटात करणार प्रवेश
सतीश चव्हाण हे पदवीधर मतदारसंघाचे आमदार
17/1/2025 16:5:25
सैफ अली खान हल्ल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून 35 पथकांची स्थापना
35 पथकांपैकी 20 लोकल पोलीस, तर 15 क्राइम ब्रांच पोलिसांची पथकं तपास करणार
17/1/2025 15:40:17
वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ एक व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढला
केजच्या शिरूर गावातील घटना, पोलीस घटनास्थळी
17/1/2025 15:20:36
नांदेडच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याला मारहाणप्रकरणी एकाला अटक
भाग्यनगर पोलिसांकडून आरोपी क्षितीज कांबळेला अटक
पोलीस कर्मचारी आकाश सावंतसह आणखी एक आरोपी फरार
17/1/2025 14:30:41
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सैफ अली खानची भेट घेणार
लीलावती रुग्णालयात जाऊन एकनाथ शिंदे सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस करणार
17/1/2025 14:25:24
ओशिवरा डेपोत कंत्राटी बसला भीषण आग
बेस्ट बसची दुरुस्ती करताना हंसा कंपनीच्या सीएनजी बसला लागली आग
17/1/2025 14:24:47
लोणावळा ॲम्बी व्हॅली मार्गावर वाहतूक कोंडी
घाटात ऊसाची मळी सांडल्यामुळे वाहने अडकली
स्थानिक संस्थांनी मळी बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत
17/1/2025 13:47:15
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण
17/1/2025 13:26:14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांची शिक्षा
अल कादिर ट्रस्ट प्रकरणात त्यांच्या पत्नीलाही 7 वर्षांची शिक्षा
17/1/2025 12:52:21
सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा – डॉक्टर
लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांची पत्रकार परिषद घेत माहिती
17/1/2025 12:25:1
बीडच्या अंबाजोगाईत गोळीबार झाल्याची घटना समोर
जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय
मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचा संशय
17/1/2025 12:17:26
आळंदी – पंढरपूर पालखी महामार्गावर भीषण अपघात
अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
17/1/2025 11:46:55
सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात एकजण ताब्यात
मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले
काल झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी घेतली एकाला ताब्यात
17/1/2025 11:9:16
80 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट मोरोक्कोजवळ उलटली
40 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू
50 हून अधिक प्रवासी बुडल्याची शक्यता
17/1/2025 10:39:45
आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या
नातेवाईकांनीच 2 भावांची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक माहिती
अजय आणि भरत भोसले असे हत्या या भावांची नावे
17/1/2025 10:11:40
मुंबईत संघ आणि भाजपची दोन दिवसांची बैठक
संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक
मुंबईतील यशवंत भवनमध्ये 18, 19 जानेवारीला बैठक
फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित
17/1/2025 10:7:43
आज 1.30 ते 3.30 दरम्यान बदलापूर – खोपोली लोकल बंद राहणार
मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड सुधारण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार
17/1/2025 9:28:48
पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटविरोधात पोलिसांची मोठी कारवाई
10 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या 2070 बनावट नोटा जप्त
गस्तीदरम्यान संशयित ताब्यात, 500 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या
आरोपीला बनावट नोटा पुरवणारे नवी मुंबईतील तीन जण ताब्यात
तिघांच्या चौकशीनंतर नालासोपाऱ्यात एका आरोपीला बेड्या
17/1/2025 8:54:4
गोंदियात पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या
पोलिसांनी स्वतःवरच झाडली बंदुकीने गोळी
AK 47 बंदुकीने स्वतःच्या डोक्यावर गोळी झाडली
17/1/2025 8:50:41
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क आकारणी
कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत
कांद्याच्या भावावर परिणाम होण्याची शक्यता
17/1/2025 8:45:8
आज आंबेडकरी अनुयायांचा परभणी ते मुंबई लाँग मार्च
सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपींवर कारवाई न झाल्याने आक्रमक
दुपारी 1 वाजता परभणीतून हा लॉंग मार्च मुंबईकडे निघणार
17/1/2025 7:59:9