बीड : शाळेतील माध्यान्ह भोजनातून (खिचडी) ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी विडा येथे समोर आली. सुरवातीला या विद्यर्थ्यांवर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून नंतर निरीक्षणासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
विडा येथील रामकृष्ण महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दुपारी माध्यान्ह भोजनाची खिचडी खाल्ल्यानंतर मळमळ, उलटी, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना गावातीलच प्राथमिक आरेाग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. लव्हारे व डॉ. गायकवाड यांनी तपासणी करून उपचार केले. स्वाती नागरगोजे, स्वाती मुंडे, रेणुश्री नागरगोजे, ओंकार मुंडे, वैभव मुंडे, रोहन रसाळ, यश पटाईत, शुभम नागरे, समर्थ कदम, रोहन आव्हाड, श्रीनिवास जायभाये, कृष्णा हिंवत, प्रमोद चौरे, करण किरवले, आर्यन वरपे, श्रेयस भुतेकर, संग्राम देवगुडे, अर्जुन लांडे, स्वप्नील चिखले, ओंकार नागरगोजे, ज्ञानेश्वर हाडुळे.
आदिनाथ मुंडे, आदित्य जाधव, विठ्ठल खंदारे, अनिलकेत मजले, पंकज नागरे, मोहन चव्हाण, हरिओम खाडे, दीपाली गुरव, अमोल नागरे, संकेत हुंडेकर, प्रतीक कोल्हे अशी या विद्यार्थ्यांची नावे असून सर्व जण ११ ते १६ वर्ष वयोगटातील आहेत. रात्री या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या निरीक्षणात उपचार व्हावेत यासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
विद्याथर्यांना उलटी, मळमळ, डोकेदुखी असा त्रास आहे. कोणताही गंभीर प्रकार नसून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली उपचार व्हावेत, यासाठी त्यांना शासकीय रुग्णवाहिकेतून केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
- डॉ .एस.जे. लव्हारे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, विडा.