पौष्टिक मेथीचे पराठे रेसिपी
Webdunia Marathi January 18, 2025 03:45 PM

साहित्य-
मेथी पाने - एक कप
पीठ - दोन कप
ओवा- अर्धा टीस्पून
हळद - 1/4 टीस्पून
तिखट - 1/2 टीस्पून
चवीनुसार मीठ
तेल - अर्धा टेबलस्पून
पाणी
तूप किंवा बटर

ALSO READ:

कृती -
सर्वात आधी मेथी स्वच्छ करून चिरून घ्यावी. आता एका मोठ्या भांड्यात पीठ चाळून घ्यावे. आता त्यात चिरलेली मेथीची पाने, ओवा, हळद, तिखट, तेल, मीठ घालावे. हे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करावे. नंतर हळूहळू पाणी घालून पीठ मऊ मळून घ्यावे. पीठ मळल्यानंतर काही वेळ झाकून ठेवावे. आता मळलेल्या पिठाचे छोटे गोळे बनवा. पिठाचा गोळा घेऊन तुम्हाला आवडेल त्या आकारात पराठा लाटून घ्यावा. आता पॅन गरम करून त्यावर तूप किंवा तेल लावावे. लाटलेला पराठा तव्यावर टाकून सर्व बाजूनी शेकून घ्यावा. आता पराठा बनल्यानंतर आवडीप्रमाणे त्यावर बटर टाकू शकतात. तर चला तयार आहे आपला पौष्टिक असं मेथीचा पराठा रेसिपी, गरम पराठा नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.