सोन्याचा दर: दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. देशाची राजधानी दिल्लीत लवकरच सोन्याच्या दराचा नवा विक्रम होऊ शकतो. याचे कारण म्हणजे सलग तीन दिवसांत सोन्याच्या दरात 1420 रुपयांची वाढ झाली आहे. त्याआधी, सलग 6 दिवसात सोन्याच्या दरात 1600 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली होती. 9 दिवसांत सोन्याचे भाव 3,000 रुपयांनी वाढले आहेत. आज सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढला आहे. सध्या सोने 81,600 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे.
देशाची राजधानी दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 700 रुपयांनी झेपावला आणि 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. गुरुवारी सोन्याचा भाव 81,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून 81,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 80,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. शुक्रवारी चांदीचा भाव 500 रुपयांनी घसरून 93,500 रुपये प्रति किलोवर आला, जो मागील सत्रात 94,000 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
सलग तीन दिवसांत सोन्याच्या दरात 1400 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 220 रुपयांची वाढ झाली. गुरुवारी सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ दिसून आली. शुक्रवारी सोन्याचा भाव 700 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह विक्रमी पातळीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सलग तीन दिवस सोन्याचा भाव 1,420 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागला आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या खिशाला झळ बसत आहे.
विशेष म्हणजे दिल्लीतील सोन्याच्या दराचा विक्रम लवकरच तुटण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी स्थानिक बाजारात 99.9 टक्के शुद्धता आणि 99.5 टक्के शुद्धतेचे सोने अनुक्रमे 82,400 रुपये आणि 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. आता 99 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून अवघ्या 400 रुपयांनी घसरल्या आहेत. सोमवारीही सोन्याचे भाव असेच सुरू राहिल्यास भाव 82,400 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत कल असूनही, देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूच्या भावात वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..