मंत्री धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी मस्साजोगमधील सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्या भावूक झाल्या. माझी आंबेजोगईच्या जमीनीचा कोर्टातून निकाल लागल्यानंतर त्या जमिनीचे पैसे आल्यास संतोष देशमुख यांच्या मुलांच्या कुटुंबियांच्या शिक्षणासाठी आपण मदत करु असेही सारंगी महाजन म्हणाल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे दु:ख आणि माझे दु:ख एकसारखेच आहे. मी सोळा वर्षे एकटी लढत आहे. तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी अख्खे गाव उभे आहे. हाच काय तो फरक आहे. मी ११ वर्षे सामाजिक कार्य करीत आहे. सोळा वर्षांपूर्वीचे माझे दिवस मला आठवले. धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडे यांनी कुटुंबाला भेट दिलेली नाही यावरुन त्यांचे या प्रकरणात हात किती बरबटले आहेत हे कळतंय. माझ्या जमीनीच्या व्यवहारात मला फसवले. रजिस्ट्रेशन रद्द करुन तुझे पैसे घेऊन जा, मी ते पैस तसेच कपाटात ठेवले आहेत. खर्च देखील केले नाहीतअसे मी त्याला सांगितले. मी त्याला फोन केला तर तो थेट म्हणाला की मामी तुम्ही फॉलोअप ठेवला नाही. इतकी दिवस आम्ही जमीन सांभाळत आहोत असा तो बोलत होता. मी त्याच्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठी असताना त्याला असे बोलायला लाज नाही वाटत का? तू जमीन सांभाळत होतास तर स्वत:हून पुढे का नाही आलास. सहा फुटाचा कपडा लागतो जाताना इतकी जमीन घेऊन कुठे जाणार आहेस असा जळजळीत सवाल त्यांनी यावेळी केला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मुंडे साहेबांची कमवलेली इतक्या वर्षांची इज्जत घालविली आहे.