-rat१६p१३.jpg-
P२५N९८९४७
सावर्डे ः देवरूख येथील वार्षिक मेळाव्यात बोलताना संघटना अध्यक्ष सागर पाटील.
---
शिक्षणक्षेत्रातील अस्थिरतेवर टीडीएफचा निशाणा
सागर पाटील ः देवरूख येथे अध्यापक संघाचा वार्षिक मेळावा
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १७ ः शासनाने शिक्षकांवर लादलेली टीईटी परीक्षा, संचमान्यता, अतिरिक्त होण्याची भीती तसेच शून्यपटाच्या शाळा बंद पडण्याचा धोका आदी कारणांनी शिक्षणक्षेत्रात अस्वस्थता आहे. याबाबत सडेतोड भूमिका टीडीएफ संघटनेने मांडली आहे. शिक्षकांच्या हक्कासाठी संघटनेने लढा दिला आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी केले.
देवरूख येथे झालेल्या संगमेश्वर तालुका माध्यमिक अध्यापक संघाचा वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ सल्लागार अंबादास जरे, कार्याध्यक्ष संभाजी देवकाते, सचिव रोहित जाधव, महिला उपाध्यक्षा अर्चिता कोकाटे, सुशांत कवीस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, दहावी-बारावी व विविध शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव करण्यात आला. राज्य व जिल्हास्तरावर विशेष कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास जरे यांनी संघटनेचे महत्त्व व भावी वाटचालीविषयी भूमिका मांडली. रोहित जाधव, सुशांत कवीस्कर, अर्चिता कोकाटे, आत्माराम मेस्त्री आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक सुनील केसरकर यांनी केले. सूत्रसंचालन मेघा भालेकर, उज्ज्वला वारे यांनी केले आभार समीर आत्तार यांनी मानले.
---