Dhanteras Gold Rate : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीदारांना मोठी दिलासा; सोन्याच्या किंमतीत मोठी घट
ET Marathi October 18, 2025 06:45 PM
मुंबई : आज दिवाळीचा महत्वाचा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी होय. आजच्या दिवशी हिंदू परंपरेनुसार धन, संपत्तीची पुजा केली जाते. तसेच शुभ खरेदी म्हणून सोन्याची खरेदीही बहुतांश कुटुंबांमध्ये करण्याची प्रथा आहे. पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. तो जीएसटीसह 1,34,800 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. परंतू आज मात्र सोन्याची किंमत त्या तुलनेत थेट 3000 रुपयांनी कमी झालेली दिसून येत आहे.



धनत्रयोदशीला सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीसा दिलासा देणारी बाब आहे. कारण सोन्याच्या दरांमध्ये कालच्या तुलनेत आज काहीशी घट झाली आहे. तर चांदीच्या किंमतीततही घट झाली आहे. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 127,320रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 116,710 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. यासोबतच चांदीची किंमत 157,300 रुपये प्रति किलो इतकी आहे.



गेल्या वर्षी दिवाळीत सोन्याचे भाव या दिवाळीपर्यंत कसे वाढले याबाबत तक्ता पाहू



महिना सोन्याची किंमत (₹ प्रति 10 ग्रॅम)
ऑक्टोबर 2024 78,500
नोव्हेंबर 2024 80,000
डिसेंबर 2024 83,000
जानेवारी 2025 87,000
फेब्रुवारी 2025 90,000
मार्च 2025 93,000
एप्रिल 2025 96,000
मे 2025 91,000
जून 2025 92,000
जुलै 2025 94,000
ऑगस्ट 2025 95,000
सप्टेंबर 2025 1,10,000
ऑक्टोबर 2025 1,32,000
दरवाढीची कारणे आणि अपेक्षा :अमेरिकेतील संभाव्य क्रेडिट संकट, भू-राजकीय तणाव (विशेषतः अमेरिका-चीन व्यापार समस्या), अमेरिकेचा डॉलर कमकुवत होणे आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा ही सोन्याच्या दरवाढीची प्रमुख कारणे आहेत.



यावर्षी ग्राहक हलक्या वजनाचे आणि कमी कॅरेटचे सोन्याचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देतील अशी अपेक्षा आहे. एमएमटीसी-पीएएमपी (MMTC-PAMP) चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ, समित गुहा यांच्या मते, गुंतवणुकीसाठी 24-कॅरेट सोन्याची आणि चांदीची नाणी व बिस्किटे खरेदी करणाऱ्यांची मागणी लक्षणीय वाढली आहे.



चांदीच्या दरात झालेली थोडीशी नरमाई वाढलेल्या पुरवठ्यामुळे आहे, असे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले. यामुळे चांदीवरील प्रीमियमही कमी झाला आहे. जागतिक स्तरावर चांदीच्या वाढत्या औद्योगिक मागणीमुळे मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, विशेषतः सौर ऊर्जा (Solar Energy) आणि इलेक्ट्रिक वाहनांमुळे (Electric Vehicles) मागणीत मोठी वाढ झाली आहे. हा तुटवडा 2025 पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.



सोन्यापेक्षा स्वस्त असलेल्या प्लॅटिनमची किंमत $48,600 प्रति 10 ग्रॅम आहे आणि या धनत्रयोदशीला पुरुषांच्या दागिन्यांमध्ये प्लॅटिनमची मागणी सुमारे 20% ने वाढली आहे, अशी माहिती विकास कटारिया, प्रवर्तक, डीपी आभूषण यांनी दिली.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.