गाझियाबादमध्ये लोणीच्या घराला भीषण आग; चौघे होरपळाले
Webdunia Marathi January 19, 2025 09:45 PM

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी येथे एक भीषण अपघात झाला आहे. घराला लागलेल्या आगीत तीन मुलांसह चौघांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोघे भाजले आहेत. चौघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.


मिळालेल्या माहितीनुसार, लोणी कोतवाली परिसरातील कांचन पार्क कॉलनीतील एका घराच्या दोन मजल्यांना रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका महिलेसह तीन मुलांचा मृत्यु झाला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणून मृतदेह बाहेर काढले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

ALSO READ:

या घटनेत शाहनवाज, शाहनवाजची पत्नी आयशा, शाहनवाजचा मुलगा जान यांनी शेजारच्या छतावरून उडी मारून आपला जीव वाचवला.

मूळचे मवाना मेरठचे राहणारे शाहनवाज आणि शमशाद हे लोणीच्या कांचन पार्क कॉलनीत सुमारे 30 वर्षांपासून राहतात. दोन्ही भाऊ टेलरिंगचे काम करतात. शाहनवाज त्यांची पत्नी गुलबहार आणि दोन मुले झीशान आणि अयान असा परिवार आहे.

शमशाद यांच्या पश्चात पत्नी आयशा आणि दोन मुले शान आणि जान आहेत. हे आठही लोक चार मजली घरात राहतात. शनिवारी रात्री सर्वजण घराच्या चौथ्या मजल्यावर दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपले.

सकाळी अचानक तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आग लागल्यावर घरभर धुराचे लोट पसरले. जेव्हा धूर पसरला तेव्हा शाहनवाज, शाहनवाजची पत्नी आयशा, शाहनवाजचा मुलगा जान यांनी शेजाऱ्यांच्या छतावरून उडी मारून त्यांचे प्राण वाचवले.


घरातील बाकीचे सदस्य आत अडकले होते. यावर दोन्ही भावांनी पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न सुरू केला. आग चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. आवाज होताच आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी कुटुंबीयांसह पाणी टाकून आग विझवण्यास सुरुवात केली.


काही वेळाने पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाणी टाकून आग विझवण्यास सुरुवात केली. सुमारे तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

या घटनेत शमशादचा मुलगा जान,पत्नीआयशा हे दोघे जखमी झाले आहे तर शाहनवाज यांची पत्नी गुलबहार, मुलगा शान, शाहनवाजचा मुलगा जीशान अणि अयान यांचा मृत्यु झाला आहे.

Edited By - Priya Dixit

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.