Manu Bhaker Family Member Die in Accident : पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक विजेती मनु भारकरला नुकतेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण आता च्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. रविवारी मनुच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. चरखी दादरीमधील महेंद्रगड रोडवर हा अपघात झाला. ज्यामध्ये मनूच्या मामा व आजीला आपला जीव गमवावा लागला आहे.
मनूचे मामा व आजी स्कूटीवरून प्रवास करत असताना ब्रेझा कारनेने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले व आता दोघांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत कार चालक पसार झाला होता.पोलिसांनी कार चालकाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनिसार, मामाचे वय ५० वर्ष व आजीचे वय ६५ वर्ष होते व ते हरियाणामधील भिवानी जिल्ह्यातील रहिवाशी होते.
मनू भारकचा मामा युद्धवीर हरियाणातील रोडवेजमध्ये चालक म्हणून काम करायचे. कामावर जाण्यासाठी स्कूटीवरून प्रवास करत होते. आपल्या छोट्या मुलाकडे निघालीली आजी देखील सोबत होती. पण कलीयाणा येथे पोहचताच चुकीच्या बाजूने येणाऱ्या कारने त्यांना टक्कर दिली. टक्कर इतकी जोरदार होती की गाडी रस्ताच्या बाजूला उलटी झाली व दोघांनाही आपला जीव गमवावा लागला.
भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकरला १७ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपती भवन येथे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी पुरस्कारासाठी नाव नसल्याने बरीच चर्चा रंगली होती, तिचे नाव नसल्याने तिच्या वडिलांनी संताप व्यक्त केला होता. पुरस्कार आणि सन्मान हे मला प्रेरित ठेवतात पण ते माझे अंतिम ध्येय नाही, असे मनूने आपले मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता मनूला राष्ट्रपतींच्या हस्ते आज खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.