मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. पालकमंत्रिपदवरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आला आहे. त्यानंतर राज्य सरकारने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने पालकमंत्रिपदाची निवड रद्द केली आहे. राज्य सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.