सलमान खानच्या 'बिग बॉस 18'चा (19 जानेवारी) ग्रँड फिनाले पार पडणार आहे. करणवीर मेहराने 'बिग बॉस 18'ची ट्रॉफी उचलली आहे. तर विवियन डिसेना उपविजेता झाला आहे. 'बिग बॉस 18' ((Bigg Boss 18)) हा सीझन 6 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शोने तब्बल तीन महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
' 18'मध्ये सुरुवातीला 18 सदस्यांनी घरात प्रवेश केला होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून पाच सदस्यांची एन्ट्री करण्यात आली. 'बिग बॉस 18'च्या फिनालेला 6 सदस्य होते. त्यातून पहिली ईशा, दुसरी चुम दरांग, तिसरा अविनाश मिश्रा आणि चौथा रजत दलाल हे सदस्य घराबाहेर पडले.
शेवटी टॉप २ मध्ये करणवीर मेहरा आणि डिसेना हे सदस्य गेले. त्यातून करणवीर मेहराने 'बिग बॉस'ची ट्रॉफी उचलून विवियन डिसेनाला (Vivian Dsena) मात दिली आहे.
'बिग बॉस' टॉप 6विवियन डिसेना
मेहरा
अविनाश मिश्रा
रजत दलाल
ईशा सिंह
चुम दरांग
बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात भांडणे पाहायला मिळत आहे. प्रत्येक दिवशी यांच्यात वाद झाले आहेत. संपूर्ण सीझन हे दोघे एकमेकांच्या विरोधात बोले आहेत. मात्र आता बिग बॉसच्या घरातून बाहेर येताना पुन्हा यांच्यात मैत्रीची चाहूल लागल्याचे पाहायला मिळत आहे.
विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा हे दोन्ही स्पर्धक 'बिग बॉस 18'चे तगडे सदस्य होते. या दोघांनीही टिव्हीचे क्षेत्र खूप गाजवले आहे. यांच्या मालिका आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. 'बिग बॉस 18' ने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या शोने तीन महिने प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन केले आहे. बिग बॉसचे चाहते आता बिग बॉसच्या नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.