Bigg Boss 18: शॉकिंग एविक्शन; 'टॉप 3' मधून रजतची एक्झिट, चाहते नाराज
Saam TV January 20, 2025 06:45 AM

Bigg Boss 18 final : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 18' व्या भागाचा ग्रँड फिनाले सुरु असून या भागात ईशा सिंग सर्वात आधी बाहेर पडली. त्यानंतर राहिलेल्या ५ स्पर्धाकांपैकी चुम दरंगला निरोप दिला तर आता ..... या तिसऱ्या स्पर्धकाची एक्सिट झाली आहे.

रजत दलाल बिग बॉसमधून बाहेर पडला आहे

च्या घरात रजत दलालने अनेक समीकरणे बनवली. तो आत्मविश्वासाने खेळला आणि प्रेक्षकांना त्याचा यंग एन्ट्री मॅन लूक खूप आवडला. रजतने आपल्या स्पष्टवक्ता शैलीने सर्वांचे मन जिंकले. अनेकांनी त्याला बिग बॉसचा विजेताही म्हटले. पण रजत दलाल बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकला नाही. रजत दलाच्या बिग बॉस १८ च्या घरातून पडला असून आता विजेता विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात स्पर्धा सुरु आहे.

रजत दलालच्या एक्सिटवर नेटकऱ्यांनी काय म्हटले?

रजत दलालच्या बाहेर पडण्यावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, "मला अजूनही विश्वास बसत नाहीये... हे कसे घडले" दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, "रजत खूप चांगला खेळला आहे... तो प्रेक्षकांसाठी एक विजेता आहे." रजतला YouTuber आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवकडून खूप पाठिंबा मिळाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.