Salman Khan: सलमान खान नाही करणार बिग बॉसचा पुढचा सीझन होस्ट; म्हणाला, 'मी पुढचा सीझन होस्ट...'
Saam TV January 20, 2025 06:45 AM

Salman Khan: बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. बिग बॉस 18 ची ट्रॉफी करणवीर मेहराने आपल्या नावावर केली आहे. तर, विवियन डिसेना या शोचा उपविजेता ठरला आहे. या शोमध्ये सलमान खान स्पर्धकांसोबत खूप मजा करताना दिसला आहे. सलमानने कशिश कपूरची खूप मस्करी देखील केली. पण शो दरम्यान, सलमानने पुढील सीझन होस्ट करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

सलमान खान बिग बॉसच्या पुढील सीझनचे होस्टिंग करणार नाही

सलमान खानने गमतीने म्हटले की अंतिम फेरीतील स्पर्धकांना असे वाटेल की ते खूप पुढे आले आहेत आणि आता त्यांच्या जिंकण्या आणि हरण्याने काही फरक पडत नाही. पण हे चूक असून तुम्ही जास्त पुढे नाही आलात. सलमानचे हे बोलणे ऐकून सगळे प्रेक्षक हसायला लागले.

पुढे म्हणला की दररोज च्या घरात राहणे किती कठीण आहे आणि त्याला टॉप ६ मध्ये स्थान मिळवल्याबद्दल सर्व स्पर्धकांचा मला अभिमान आहे. त्याच्या अनुभवाबद्दल बोलताना सलमान म्हणाला, "मी या शोचे १५-१६ सीझन होस्ट केले आहेत. मी पुढचा सीझन होस्ट करू शकणार नाही."

सलमान खानने जुन्या स्पर्धकासोबत मजा केली

संवाद पुढे चालू ठेवत सलमान खान म्हणाला, "मला खूप आनंद आहे की आज स्टेजवर येण्याचा शेवटचा दिवस आहे, मी हा सिझन संपण्याची वाट पाहत आहे." त्यानंतर त्याने शोच्या जुन्या स्पर्धकांशीही चर्चा केली. सलमानने सर्वांना विचारले की कोणता स्पर्धक ग्रँड फिनालेमध्ये स्थान मिळविण्यास पात्र नाही. श्रुतिका अर्जुन, कशिश कपूर आणि चाहत पांडे यांनी ईशा सिंगचे नाव घेतले. तर, करण वीर मेहराने सांगितले की, बाहेर पडलेल्या स्पर्धकांमध्ये, चाहत पांडे लवकर स्पर्धेतून आऊट झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.