'बिग बॉस 18' च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये अक्षय कुमार आणि वीर पहाडिया 'स्काई फोर्स'च्या प्रमोशनसाठी आले होते. परंतु सलमान खानला येण्यास उशीर झाल्यानं शुटिंग न करताच अक्षय कुमार बिग बॉसच्या सेटवरून निघून गेला.
बॉलिवूडचा बादशाह अक्षय कुमार लवकरच 'स्काय फोर्स' चित्रपट येणार आहे. चित्रपटात अक्षयसोबत वीर पहाडिया पहायला मिळणार आहे. दरम्यान दोघेही सलमान खानच्या 'बिग बॉस 18' च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये प्रमोशनसाठी आले होते. परंतु सलमानला येण्यास उशीर झाल्याने अक्षयला शुटिंगला न करताच निघावं लागलं.
धमकीच्या कारणामुळे सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्यामुळे 'बिग बॉस'च्या सेटवर सुरुवातील सुरक्षारक्षक जातात आणि अप्रुवल मिळाल्यानंतर सलमान खान सेटवर जातो. त्यामुळे अक्षय आल्यावर सुरक्षेच्या कारणामुळे सलमानला येण्यास उशीर झाला.
त्याच्या 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात शुटिंग करण्यासाठी अक्षय पोहचला होता. परंतु सलमान वेळेत न पोहचल्यामुळे त्याला निघावं लागलं. परंतु सलमानने अक्षयसोबत फोनवर बोलणं केलं. त्यानंतर अक्षय कुमार पुन्हा सेटवर आलाय.
कधी रिलीज होणार स्काय फोर्सस्काय फोर्स 24 जानेवारीला चित्रपटगृहात प्रसिद्ध होणार आहे. चित्रपटात, वीर पहाडियासह सारा अली खान आणि निम्रत कौर या चित्रपटात आढळणार आहे.