मुंबई : राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यानंतर आता शनिवारी (19 जानेवारी) महाराष्ट्राच्या पालकमंत्री पदाची नावे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली. या यादीत शिवसेनेचे नेते दादा भुसे आणि भरत गोगावले यांना स्थान मिळालेले नाही. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद न मिळाल्याने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. कारण ते त्यांच्या दरे गावी गेले आहेत. (Angry over Dada Bhuse and Bharat Gogavale not getting the guardian ministership मराठी went to Dare village)
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापनेवेळी महायुतीत धुसफूस सुरू होती. यानंतर आता पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा महायुतीत धुसफूस सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा आहे. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद देण्यात यावे, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. मात्र शनिवारी जाहीर झालेल्या पालकमंत्रिपदाच्या यादीमध्ये मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना स्थान मिळू शकलेले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत.
हेही वाचा – Suresh Dhas : बीडचं पालकमंत्रिपद का मिळाल नाही? सुरेश धसांनी सांगितली आतली बातमी
एकनाथ शिंदे दरे गावी जाण्यासंदर्भात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे नाराज असतील, तर भाजपा नेते याबाबतीत काय तो निर्णय घेतील. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाशी किंवा उत्तराशी माझा काहीही संबंध नाही. असे म्हणत त्यांनी या विषयावर जास्त बोलणे टाळले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे पालकमंत्रिपदावरून खरंच नाराज आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे बहुमताने सरकार आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली होती. मात्र भाजपाने 132 जागा जिंकल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे स्पष्ट होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद किंवा इतर महत्त्वाची खाती मागितली आहेत, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र भाजपाकडून होत असलेल्या विरोधामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्यामुळे दिल्लीमध्ये भाजपाच्या केंद्रीय नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यावर तातडीने सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावी रवाना झाले होते. त्यामुळे महायुतीच्या तिन्ही नेत्यांची मुंबईत होऊ घातलेली बैठकही रद्द करण्यात आली होती.
हेही वाचा – Nitesh Rane : हिरव्या सापांना दूध पाजणारे मातोश्रीवर वावरतात, राणेंची घणाघाती टीका