Guillain Barre Syndrome : पुण्यात दुर्मिळ आजाराची एन्ट्री; २२ संशयित रुग्णांवर उपचार; जाणून घ्या लक्षणे
Idiva January 22, 2025 05:45 PM

पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) नावाच्या एका दुर्मिळ आजाराने एन्ट्री घेतली आहे. या आजाराचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना दीनानाथ मंगेशकर, नवले आणि पूना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हे रुग्ण सिंहगड रोड, धायरी इत्यादी परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांना तीव्र स्वरूपाचे जुलाब , ताप, अंगदुखी अशी लक्षणे सुरुवातीला दिसून आली आणि त्यानंतर पायामधील ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसायला लागली. दरम्यान, गुइलेन बॅरी सिंड्रोम आजार म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? याबाबत आपण या लेखात जाणून घेणार आहोत. याविषयची माहिती आत्ययिक चिकित्सा तज्ज्ञ डॉ. पद्मनाभ केसकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

उत्तम आरोग्यासाठी प्या 'हा' रस

गुइलेन बॅरी सिंड्रोम आजार काय आहे? (What is Guillain Barrie Syndrome disease?)

या आजाराचा किंवा सिंड्रोमचा शोध फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट जॉर्जेस गुइलेन आणि जीन अलेक्झांडर बॅरी यांनी १९१६ साली लावला म्हणून त्यांच्या नावामुळे या सिंड्रोमचे नाव गुइलेन बॅरी सिंड्रोम असे पडले. त्यामुळे हा काही नवीन आजार नाही आपल्या भारतामध्ये सुद्धा या आजाराच्या केसेस आढळतात. अगदी आपल्या दवाखान्यांमध्ये सुद्धा आपण या आजाराचे तुरळक रुग्ण बघितलेले असतील. पण, अचानक जेव्हा एखाद्या आजाराच्या केसेस लक्षणीय रित्या वाढायला लागतात तेव्हा ती नक्कीच काळजीची बाब असते, असे मत डॉ. पद्मनाभ केसकर यांनी व्यक्त केले.

istock

ऑटो इम्युन स्वरूपाचा आजार (Auto immune disease)

या आजारामध्ये माणसाची स्वतःचीच प्रतिकारशक्ती स्वतःच्या नर्व्हस सिस्टीम वरती हल्ला चढवते. आणि शरीरातील नसा आणि स्नायू याचे कार्य त्यामुळे बाधित होते. म्हणजेच हा एक प्रकारे ऑटो इम्युन स्वरूपाचा आजार आहे. हा आजार अचानक एखाद्याला का होतो याचे अजून ठाम स्वरूपाचे उत्तर सापडलेले नाही. पण, असे लक्षात आले आहे की बरेचदा एखादे व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर काही वेळेला लसीकरणानंतर किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया झालेली असते अशा वेळेला हा आजार उद्भवतो. अशा वेळेला शरीराची स्वतःची प्रतिकारशक्ती हायपर रिऍक्ट होते.

पेरूसह ९ फळे ज्यात असते संत्र्यापेक्षा जास्त 'व्हिटॅमिन सी'

istock

निदान पटकन होत नाही (Diagnosis is not quick)

कधी कधी काही रुग्णांमध्ये याचे निदान पटकन होत नाही. एखादा रुग्ण पायामध्ये अशक्तपणा वाटत आहे किंवा संवेदना कमी झालेल्या आहेत म्हणून डॉक्टरांकडे येतो. अशा वेळेला त्या रुग्णांमध्ये हा आजार असेल याचा पटकन अंदाज कधी कधी येत नाही आणि बाकी अन्य कारणांचा विचार केला जातो. पण, कालांतराने पायामधील संवेदना कमी होणे तसेच ताकद कमी होणे, उभे राहण्यासाठी - चालण्यासाठी पायात जीव न राहणे अशी लक्षणे पुढे दिसायला लागल्यानंतर या आजाराचा मग संशय येतो.

हेही वाचा : Vagina Smell Reason : योनीतून येणाऱ्या दुर्गंधीला आपला आहार कारणीभूत ठरतो का?

istock

श्वसनासाठी व्हेंटिलेटरची गरज भासू लागते (A ventilator is needed for breathing)

हे रुग्ण सुरुवातीला कमी न होणारा ताप ज्याचे नक्की निदान होत नाही आहे असे लक्षण घेऊन येतात आणि नंतर या रुग्णांमध्ये नर्व्हस सिस्टिम रिलेटेड विकनेस आणि इतर लक्षणे दिसायला लागतात. काही रुग्णांमध्ये श्वसनाचे स्नायू पण दुर्बल व्हायला लागतात आणि रुग्णाला स्वतःहून श्वास घेता येत नाही आणि मग त्याला श्वसनासाठी व्हेंटिलेटरची गरज भासू लागते.

हेही वाचा : पीरियड्सच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? करा 'हे' उपाय; दुर्गंधी दूर होण्यास होईल मदत

istock

गुइलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे (Symptoms of Guillain Barrie Syndrome)
  • या आजाराच्या सुरुवातीला रुग्ण फक्त हाता पायांमध्ये मुंग्या येणेकिंवा हात पाय बधिर पडणे.
  • यानंतरच्या टप्प्यामध्ये रुग्णाच्या हात किंवा पायांमधील ताकद कमी व्हायला सुरुवात होते. यात पण व्यवच्छेदक लक्षण म्हणजे दोन्ही बाजूला लक्षणे एक सारखी असतात. म्हणजे फक्त एका पायातलीच ताकद कमी होते असे होत नाही तर दोन्ही बाजूला सारख्याच प्रमाणात लक्षणे निर्माण होतात.
  • ही लक्षणे किती वेगाने निर्माण होतील हे सांगता येत नाही म्हणजे एखाद्या रुग्णामध्ये अर्ध्या दिवसांमध्येच या सर्व लक्षणांची तीव्रता वाढत जाऊ शकते तर एखाद्यामध्ये दोन आठवडे सुद्धा लागू शकतात.
  • हेही वाचा : Tea Myths & Facts : चहा पिल्याने त्वचा काळवंडते...? जाणून घ्या चहाच्या बाबतीत...
  • ही जी स्नायूमध्ये दुर्बलता येत जाते ती अगदी शरीराच्या वरपर्यंत म्हणजे मानेच्या, चेहऱ्याच्या स्नायूंपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे रुग्णाला गिळायला त्रास होणे, तसेच डोळ्याचे स्नायू कमकुवत होणे अशी सुद्धा लक्षणे बऱ्याच रुग्णांमध्ये दिसून येतात.
  • काही रुग्णांमध्ये ( 8% ) ही लक्षणे फक्त पायामधील स्नायू पुरती मर्यादित राहतात.
  • हा प्लॅटूचा काळ किती वेळ राहील हे निश्चित नसते. तो दोन दिवस ते सहा महिने कितीही काळ राहू शकतो.
  • त्यामुळे या आजाराचे रुग्ण किती दिवसात बरे होतील याचे निश्चित गणित नाही पण सरासरी एक आठवड्यानंतर रुग्णांमध्ये सुधारणा दिसायला सुरुवात होते.
  • या आजाराचे सर्वात धोकादायक लक्षण म्हणजे श्वसनाच्या स्नायूची दुर्बलता . सुमारे एक चतुर्थांश रुग्णांमध्ये श्वसनाला त्रास होतो. अशा रुग्णांना कृत्रिम श्वसनासाठी व्हेंटिलेटर ची गरज भासू शकते.

हेही वाचा : बीटरूट मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर की हानिकारक?

  • सुमारे दोन तृतीयांश रुग्णांमध्ये स्वायत्त मज्जासंस्था
  • पण बाधित होते. त्यामुळे हार्ट रेट आणि रक्तदाबावर पण विपरीत परिणाम होतो.
  • आत्तापर्यंतच्या एकूण लक्षणांवरून आपल्याला आता लक्षात आले असेलच की हा आजार काही रुग्णांमध्ये तीव्र ते जीवघेणा होऊ शकतो. या आजाराच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आयसीयूची गरज भासू शकते.
  • या आजाराचा मृत्युदर साधारण 7.5 % जरी असला तरी बहुसंख्य रुग्ण कालांतराने कोणत्याही शारीरिक त्रुटी शिवाय बरे होत असताना दिसतात.
  • अशा स्वरूपाची लक्षणे रुग्णांमध्ये दिसू लागल्यास त्याची हिस्टरी व्यवस्थित घेणे गरजेचे असते. बरेचदा श्वसनमार्गाचे संक्रमण किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर म्हणजे तीव्र स्वरूपाचे जुलाब इत्यादी झालेल्या रुग्णांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम निर्माण झालेला दिसतो.
  • लसीकरण नंतर सुद्धा काही अल्प प्रमाणात रुग्णांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम निर्माण झालेला आढळून आलेला आहे. स्वाइन फ्लू लस / इन्फ्लुएंझा लस किंवा कोविड लस घेतल्यानंतर अत्यंत अल्प प्रमाणात या आजाराची शक्यता वर्तवली जाते.

istock

या आजाराचे निदान? (Diagnosis of this disease)

गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या निदानासाठी कोणतीही टेस्ट करण्याची आवश्यकता नाही केवळ लक्षणे आणि रुग्णांचा इतिहास यावरून या आजाराचा अंदाज बांधता येतो.

हेही वाचा : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जागरूकता महिना 2025: गर्भाशयाच्या कर्करोग टाळण्यासाठी आवश्यक उपाय आणि काळजी

उपचार पद्धती (Treatment methods)

हा आजार ऑटो इम्युन असल्याने याला निश्चित स्वरूपाची कोणतीही औषध उपचार पद्धती नाही. पण, संशोधनानंतर असे लक्षात आले आहे की प्लाझ्माफेरेसिस किंवा इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन या दोन उपचार पद्धती प्रामुख्याने इम्युनोथेरपी म्हणून या आजारामध्ये वापरल्या जातात. पण या आजाराला ठोस उपचार नाही.



© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.