दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाला मारहाण करत डोकं फोडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलीये. हो घटना सीसीटीव्हीतही कैद झालीये.
Maharashtra Live Update : उल्हासनगरच्या आशेळे गावातून बांग्लादेशी महिलेला अटकविठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळे गावात महालक्ष्मी चाळीत बांग्लादेशी महिला वास्तव्याला असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी,
पोलीस उप निरिक्षक प्रविण खोचरे, सचिन कुंभार, पोलीस कर्मचारी सुरेश जाधव, प्रकाश पाटील, शेखर भावेकर, मिलिंद मोरे, प्रसाद तोंडलीकर, महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे या पोलीस पथकाने सापळा रचून रुमा बिबी उर्फ सालया हाफिजुल खान हिला ताब्यात घेतलं. या महिलेला मागील चार महिन्यांपासून आश्रय देणाऱ्या रफिक विश्वास यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलंय, मात्र तो फरार झाला. अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी कायदेशीर कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलिसांना हस्तांतरित करण्यात आलंय. आत्तापर्यंत १६ बांगलादेशी नागरिकांवर उल्हासनगर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
कल्याण बदलापूर महामार्गावरील विजेचे खांब तातडीने हटवा!अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गाचं रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण काही वर्षांपूर्वी करण्यात आलं. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे खांब हे रस्त्याच्या मधोमध आले. रस्त्याचं रुंदीकरण करताना हे खांब रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करणं गरजेचं असतानाही मागील १० ते १२ वर्षांपासून हे खांब रस्त्याच्या मध्येच आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक वाहन चालकांचा खांबाला धडकून अपघात झाला असून आतापर्यंत अनेक जणांचा यात बळी गेला आहे. नुकताच अंबरनाथमधील रिक्षाचालक आरिफ शेख यांचा या खांबाला धडकून अपघाती मृत्यू झाला होता. यानंतर मनसेचे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी हे खांबे हटवण्याची मागणी करत अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे महावितरण एमएमआरडीए आणि अंबरनाथ नगर पालिकेने लक्ष न दिल्याचा आरोप करत विशाल गायकवाड हे आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत खांब हटत नाहीत, मृत रिक्षाचालक आरिफ शेख याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उपोषण थांबवणार नसल्याचा इशारा विशाल गायकवाड यांनी दिला आहे.
सांगली.. विटयातील विषबाध विद्यार्थ्यांची संख्या पोहचली 29 वरसांगलीच्या विटा येथील शासकीय निवासी शाळेतील विषबाधा झालेले विद्यार्थ्यांची संख्या 29 झाली आहे.यापैकी काही विद्यार्थ्यांवर उपचार करून रुग्णालयातुन सोडण्यात आले आहे,तर अजून काही विध्यार्थी हे विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून या विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भेट घेत चौकशी केली आहे.रुग्णालयात जाऊन उपचार घेणारया विध्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधत सदर विषबाधा प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.रविवारी रात्री विटा येथिल समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेतील मटणाच्या जेवणानंतर मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता.
अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघिणीचा बछडा ठार- अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघिणीचा बछडा ठार
- समुद्रपूर तालुक्यातील धोंडगाव येथील मुनेश्वर नगर जवळील घटना
- सकाळच्या सुमारास रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने दिली धडक
- धडकेत वाघिणीच्या बछड्याचा जागीच मृत्यू
- खुर्सापार जंगलात वाघिणीचे तीन बछड्यासह होते वास्तव त्यापैकी एक
बछडा असल्याची माहिती
- वनविभागकडून घटनेची चौकशी सुरु
crime : जालन्यात जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद,कारवाईत 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...जालन्यात जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीय. मुकेश उर्फ अशोक भिकाजी तरकसे रा. (कन्हैयानगर, जालना) असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नावं असून या कारवाईत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपी मुकेश उर्फ अशोक तरकसे याने तालुका जालना पोलिस ठाणे हद्द आणि सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीत केलेल्या 5 चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून आरोपीकडून जबरी चोरीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.
ठाकरेंचा शिलेदार अडचणीतउद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा कायम
दिनकर सावंत हेआज रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार
साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात ते होते पार्टनर
काही दिवसापुर्वी दिनकर सावंत यांना हि आली होती acb ची नोटीस
दिनकर सावंत यांना साळवी कुटुंबासोबत भागिदार म्हणुन असतानाच्या टेंडर फाईल आणि इतर कागदपत्रे एससीबीने मागवली
रत्नागिरी नगरपरिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वाॅल फेसिंगचे सावंत आणि साळवी कुटुंबाने केले होते एकत्र काम
मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत याची होणार चौकशी
दिनकर सावंत यांना आज रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख
सकाळी ११ वाजता दिनकर सावंत एससीबी कार्यालयात हजर राहणार, साळवी कुटुंबामधील कुणी व्यक्ती सावंत यांच्या सोबत नसणार