शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
Marathi January 23, 2025 10:24 PM

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदारांनी ठाकरेंची साथ सोडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena) भरगोस यश मिळालं. त्यातच, आता ठाकरेंकडील आमदार व खासदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य व ऑपरेशन टायगर हाती घेण्यात आलं आहे. आता, याबाबत शिवसेनेतील वरिष्ठ नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाणाची चर्चा सुरू झाली असून शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांवर शिंदेंच्या शिवसेनेची नजर असल्याचे उघडकीस आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात या मिशनचं पुढील प्लॅनिंग होणार असल्याची माहिती आहे.

ऑपरेशन टायगरला उद्या रत्नागिरीमधून सुरुवात होत आहे. पण आधीच ते ऑपरेशन सुरू झाले असून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 10 माजी आमदार प्रवेश करतील, काही माजी आमदार हे पश्विम महाराष्ट्रातले आहेत. तर, काही लोक असे आहेत जे आम्ही येतो असे म्हणतात, पण त्यांना आम्ही घेणार नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले. ॲापरेशन शिवधनुष्यबाबत मंत्री उदय सामंत यांनी एबीपी माझावर कबुलीच दिल्याचं पाहायला मिळालं. सध्या तांत्रिक अडचण येत असल्यानं हे ॲापरेशन होल्डवर असल्याची माहिती आहे. हो आमचं ॲापरेशन शिवधनुष्य आणि ॲापरेशन टायगर सुरु आहे. खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे, तांत्रिक बाबींच्याही अडचण येत आहेत. त्यामुळं सध्या वेळ आहे, पहिले पक्षाचे पदाधिकारी येतील, मग खासदार येतील, असा गौप्यस्फोटच उदय सामंत यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.

उद्धव ठाकरेंना कंटाळून खासदार आमच्याकडे

उद्धव ठाकरेंना कंटाळून खासदार आमच्याकडे येत आहेत, आम्ही फोडाफोड करत नाही. मात्र, खासदारांनाच तिकडे राहायचं नाही तर आम्ही काय करू, असेही उदय सामंत यांनी म्हटले. कोण खासदार आहेत, कुठचे आहेत हे कळायला थोडा वेळ द्या, सगळं कळेल, असेही उदय सामंत यांनी म्हटले.

सामंतांचा ठाकरेंना टोला

सध्या काही लोकांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे वाऱ्या सुरू झाल्या ते आपण पाहिलं. जे एकतर तू राहशील किंवा मी राहील असं म्हणाले होते, ते आज फडणवीसांच्या जवळ जात आहेत. कारण, त्यांना देखील समजलं आहे की महायुती शिवाय पर्याय नाही, असे म्हणत सामंत यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं.

हेही वाचा

Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.