अक्षय शिंदे, साम टीव्ही प्रतिनिधी
jalna News Update : जालन्यात भर दिवसा एका 50 वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोसकून करण्यात आलाय. रमेश राख असं मयत व्यक्तीचे नाव आहे. जालना शहरातील गायत्री नगर परिसरामध्ये आज सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडलीय. आरोपीने खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आहे. पैशाच्या देवाण-घेवाणीतून खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान घटनास्थळी जालन्यातील सदर बाजार पोलीस दाखल झाले असून पुढील तपास आता पोलीस करत आहे.
जालना शहर हादरलं
जालन्यात भर दिवसा एका 50 वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोसकून निर्घृण खून खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जालना शहरामध्ये एकच खळबळ उडाली. पैशाच्या देवाण-घेवाणीतून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
खून करून आरोपी पोलीस ठाण्यात हजर
जालना शहरातील गायत्री नगर परिसरामध्ये एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोसकून खून केल्यानंतर संशयित आरोपी हा स्वत:हून जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला.
पैशाच्या देवाण घेवाणीतून खून झाल्याचा संशय
जालन्यात एका 50 वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने हा खून नेमकी का केला याची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी हा खून पैशाच्या देवाण-घेवाणीतूनच झाला असावा असा संशय पोलिसांना आहे.
सदर बाजार पोलीस घटनास्थळी दाखल
जालना शहरातील गायत्री नगर परिसरामध्ये खुनाची घटना घडल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला यानंतर जालन्यातील सदर बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास आता पोलीस करत आहे.