Maha Kumbh 2025 Packing: महाकुंभ मेळ्यात जाण्याचा विचार करताय, मग 'या' 5 वस्तू चूकूनही सोबत आणू नका, मिळणार नाही लाभ
esakal January 28, 2025 12:45 AM

Maha Kumbh 2025 Packing: महाकुंभ मेळा १३ जानेवारीपासून सुरू झाला आहे. यंदा प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला आहे. देश-विदेशातील नागरिक येथे स्नानासाठी येतात. तुम्हीही महाकुंभ मेळ्यात जाण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तुम्ही महाकुंभ मेळ्यात गोल्यावर तेथून पुढील ५ गोष्टी चुकूनही सोबत आणू नका. कारण तुम्हाला प्रवासाचा लाभ मिळणार नाही.

फुकत मिळालेल्या वस्तु

धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही धार्मिक स्थळी जात असाल तर तिथून फुकत काहीही घेऊ नका. जर तुम्हाला कोणी फुकत काही दिले तर घेऊ नका. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही पैसे दिले पाहिजे.

कोणाला त्रास देऊ नका


धार्मिक मान्यतेनुसार कुंभ मेळ्यात जाताना कोणाला त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. कारण कोणाला त्रास दिल्यास तीर्थक्षेत्री जाण्याचे पुण्य प्राप्त होणार नाही. त्यामुळे जर तुम्हीही महाकुंभात स्नान करणार असाल तर कोणाला त्रास न देण्याचा प्रयत्न करा. कोणाचेही दुर्दैव सोबत आणू नका.

कोणाशी शत्रुत्व


धार्मिक स्थळी जाताना तुमच्या मनात कोणाशीही वैर नाही याची खात्री करून घ्यावी. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही संगमात डुबकी मारता तेव्हा तुमच्या मनात कोणाबद्दलही वैरभाव न ठेवण्याचा प्रयत्न करा. तर कुंभमेळ्यात जाण्याचा लाभ मिळेल.



मनात राग आणि द्वेषाची भावना


महाकुंभला जाताना किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना कोणत्याही गोष्टीचा राग येऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच मनात द्वेष किंवा सूडाची भावना नसावी. त्यामुळे परत येताना कोणाबद्दलही द्वेषाची भावना बाळगू नका. कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना हे लक्षात ठेवा की,

अन्नपदार्थ


कोणत्याही धार्मिक स्थळावर जाताना तुम्ही काही धान्य किंवा फळ सोबत नेले असेल तर तिथे दान करावे. तिथून घेतलेले अन्न परत आणू नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.