टीम इंडिया मायदेशात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळत आहे. टीम इंडिया या एकूण 5 टी 20I सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाने मालिकेत सलग 2 सामने जिंकले. टीम इंडियाकडे तिसरा सामना जिंकून मालिका सुरक्षित करण्याची संधी होती. मात्र इंग्लंडने निर्णायक सामन्यात पलटवार केला. इंग्लंडने टीम इंडियावर राजकोटमध्ये विजय मिळवला आणि मालिकेतील आव्हान कायम ठेवलं. इंग्लंडने टीम इंडियाला पराभूत करत विजयाचं खातं उघडलं. मात्र त्यानंतरही टीम इंडियाकडे मालिकेत 2-1 अशी आघाडी आहे. त्यामुळे टीम इंडियाला चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पहिल्या तिन्ही सामन्यात टॉस जिंकला. टीम इंडियाने तिन्ही सामन्यात चेजिंग केली. टीम इंडियाने पहिले 2 सामने जिंकले. मात्र तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज निष्प्रभ ठरले आणि इंग्लंडने मालिका जिंकण्यापासून रोखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाला चौथ्या सामन्यात जिंकून मालिकेवर नाव कोरण्याची संधी आहे. तर इंग्लंड हा सामना जिंकून हिशोब बरोबर करण्यासाठी उत्सूक आहे. इंग्लंडने चौथा सामना जिंकला तर पाचवा आणि अंतिम सामना हा रंगतदार होईल. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने चौथा सामना हा निर्णायक असणार आहे.
दरम्यान उभयसंघातील चौथा टी 20I सामना हा पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवरुन लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवता येईल.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.