नवी दिल्ली : नेपाळमधील लुंबिनी ते श्रीलंकेतील कोलंबोदरम्यान काढल्या जाणाऱ्या गौतमबुद्ध सर्किट बाईक मोहिमेला केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पाठिंबा दिला आहे. तिन्ही देशांचे सैनिक मोटरसायकल रॅलीत सामील होणार आहेत.
मोहिमेचे समन्वयक राहुल पाटील, माल्विन मॅथ्यू, अमर नाथ आदींनी शुक्रवारी शेखावत यांची भेट घेत त्यांना मोहिमेची माहिती दिली. यावेळी मोहिमेला पर्यटन मंत्रालयाचा पाठिंबा असेल, असे आश्वासन शेखावत यांनी दिले.
‘शेजारी देशांसोबतचा सामाजिक आणि सांस्कृतिक सद्भभाव वाढीस लागावा, राजकीय संबंध दृढ व्हावेत, या उद्देशाने गौतम बुद्ध सर्किट बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे,’’ अशी माहिती राहुल पाटील यांनी यावेळी दिली.
येत्या १९ फेब्रुवारी रोजी बोधगया येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बाईक रॅली मोहिमेची सुरुवात होणार आहे. बाईक रॅलीची सांगता कोलंबो येथे होईल.