16 लाख रुपये उत्पन्न,किती कर द्यावा लागेल? किती रक्कम करपात्र ठरणार? किती कर द्यावा लागेल?
Marathi February 01, 2025 11:24 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा 2025-26 चा अर्थसंकल्प(Budget 2025) सादर केला. निर्मला सीतारामन यांनी कृषी, सूक्ष्म व लघू उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात या चार गोष्टींवर अर्थसंकल्पात भर दिला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नव्या कररचनेत 12 लाख रुपयांपर्यतचं उत्पन्न करमुक्त असल्याची घोषणा केली. नव्या करचनेमध्ये काही बदल देखील निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली आहे. गेल्या अर्थसंकल्पात नव्या कररचनेत करमुक्त उत्पन्नाचा स्लॅब  3 लाख रुपये होता. करमुक्त उत्पन्नाचा स्लॅब 3 लाख रुपयांवरुन चार लाख करण्यात आली. त्याप्रमाणामध्ये कररचनेत बदल करण्यात आले आहेत. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 16 लाख रुपये असल्यास त्याला किती कर द्यावा लागेल हे जाणून घेऊयात. त्यापूर्वी 2023-24 च्या अर्थसंकल्पातील नव्या करचनेतील स्लॅब कसे होते ते पाहुयात.

2023 च्या अर्थसंकल्पातील नव्या कररचनेचे स्लॅब

16 लाख उत्पन्न असल्यास किती कर भरावा लागेल?

नव्या कररचनेत एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 16 लाख रुपये असल्यास तिला 1,08,750 कर आणि 4350 रुपये सेस भरावा लागेल. नव्या करचेतील स्लॅब नुसार 0 ते 4 लाखांपर्यंत कर लागणार नाही. 4 ते 8 लाखांपर्यंतच्या रकमेवर 5 टक्क्यांनुसार 20000 हजार रुपये कर लागेल. 8 लाखांपेक्षा अधिक आणि 12 लाखांपर्यंतच्या रकमेवर 10 टक्क्यांनुसार 40000 हजार कर लागेल.  12 लाखांच्या वरील रकमेवर 15 टक्क्यांनुसार उर्वरित रकमेवर 48250 रुपये कर भरावा लागेल. ही रक्कम स्टँडर्ड डिडक्शनसह आहे.  तर, स्टँडर्ड डिडक्शनशिवाय 16 लाख रुपयांना 1 लाख 20 हजार रुपये कर लागू शकतो.

करमुक्त उत्पन्न 12 लाखांपर्यंत

केंद्र सरकारनं नव्या कर रचनेत करमुक्त उत्पन्न 12 लाखांपर्यंत वाढवलं आहे. म्हणजेच ज्यांचं उत्पन्न 12 लाखांपर्यंत असेल त्यांना कर लागेल मात्र रिबेट मिळाल्यानं ती निव्वळ कराची रक्कम भरावी लागणार नाही.

नव्या कररचनेत 4 लाखांपर्यंत कर नाही

2023 च्या अर्थसंकल्पातील आकडेवारीनुसार 0 ते 3 लाख  रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये कोणताही कर आकारला जात नव्हता. त्या स्लॅबमध्ये बदल करण्यात आला आहे. हा स्लॅब आता 0 ते 4 लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे.  4 ते 8 लाखांदरम्यान उत्पन्न असल्यास 5 टक्क्यांप्रमाणं कर जमा करावा लागेल.  8 ते 12 लाखांदरम्यान उत्पन्न असल्यास 10 टक्के, 12 ते  16 लाख  रुपये 15 टक्के, 16 ते 20 लाखांदरम्यान उत्पन्न असल्यास 20 टक्के, 20 ते 24 लाखांदरम्यान उत्पन्न असल्यास 25 टक्के आणि 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 30 टक्क्यांनी कर भरावा लागेल.

दरम्यान , स्टँडर्ड डिडक्शनच्या 75 हजार रुपयांच्या रकमेचा लाभ पगारावरील उत्पन्नाला मिळतो. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न उद्योगातील असल्यास त्याला स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळत नाही.

https://www.youtube.com/watch?v=gxb3gg9z9xu

इतर बातम्या :

Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.