संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक इथं प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा असून, संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेसह भौगोलिक रचनेला धक्का लागणार आहे. त्यातून जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिले असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी यांनी सांगितले.
Gas cylinder rates : बजेट सादर होण्यापूर्वी गॅस सिलेंडर झाले स्वस्तआज संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वीच LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यातील दर कपातीनुसार कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर 20 रुपयापेक्षा जास्त कमी झाले आहेत. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Rickshaw taxi fares are expensive : रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागलाआजपासून रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण रिक्षा टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागला आहे. त्यानुसार आजपासून रिक्षाचे भाडे किमान 26 रुपये, तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये असे असणार आहे.
Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणारकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आठवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहेत. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.