आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ देणारं बजेट असल्याची प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तर हे बजेट सर्व भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारं असून त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केलं आहे.
Shashi Tharoor : पगार नसेल तर? उत्पन्न कुठून येणार?, शशि थरूर यांची अर्थसंकल्पावर टीकाअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांना दिलासा म्हणत 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केली. याच घोषणेवरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीक केली आहे. याचमुद्द्यावरून काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी, जर पगार नसेल तर? उत्पन्न कुठून येणार? तुम्हाला करातून दिलासा मिळवण्यासाठी नोकरी असणं गरजेचे असल्याचा टोला लगावला आहे. तर अर्थसंकल्प सादर करताना बेरोजगारीचा उल्लेख देखील सीतारामन यांनी केला नाही, असा आरोप थरूर यांनी केला आहे.
Prithviraj Chavan : पिकांच्या हमीभावाच्या कायद्याबाबत सरकार बोलायला तयार नाही : पृथ्वीराज चव्हाणशिक्षण, आरेाग्य क्षेत्रासाठी मोठ्या कल्पना मांडलेल्या नाहीत. कृषी क्षेत्रासाठी नेहमीप्रमाणे तोंड भरून कौतुक केले आहे. शेतकऱ्यांची सर्वांत महत्वाची मागणी आहे, ती म्हणजे पिकांच्या हमीभावाच्या कायद्याबाबत सरकार बोलायला तयार नाही. राज्यात आजही दररोज सात शेतकरी आत्महत्या करतात. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
Ajit Pawar : शेतकरी, लाडक्या बहिणींना डोळ्यासमोर ठेवून मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारमार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. शेतकरी, लाडक्या बहिणी, तरुण-तरुणी आणि सर्वसामान्य जनता डोळ्यांसमोर ठेवून मी अर्थसंकल्प सादर करणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
Eknath Shinde On Union Budget : घराघरांत आता लक्ष्मीची पावलं उमटतील : एकनाथ शिंदेदेशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. तब्बल १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरांत लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर व्यक्त केला आहे.
Devendra Fadnavis : इनकम टॅक्सचा निर्णय मैलाचा दगड ठरेल : देवेंद्र फडणवीसअपेक्षापेक्षा अधिक इनकम टॅक्सची मर्यादा वाढवली आहे. बारा लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. नव्या कर प्रणालीचा मोठा फायदा मध्यमवर्ग, नोकरदारांना आणि नवतरुणांना होणार आहे. मोठे इनकम मध्यमवर्गीयांच्या खिशात होणार आहे, तो पैसा खर्च केल्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात होणार असून त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. इनकम टॅक्सची मर्यादा वाढविण्सांदर्भात धीराने घेतलेला हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Union Budget 2025 : काय स्वस्त होणार?विणकरांनी विणलेले कपडे स्वस्त होतील. चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील. सागरी उत्पादनांवरील कस्टम ड्युटी ३० वरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील कस्टम ड्युटी १५ वरून ५ पर्यंत कमी करण्यात आली.
Union Budget 2025 Live : स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची घोषणाअर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारमण यांनी स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची घोषणा केली आहे.
Nirmala Sitharaman Speech Budget Live : अर्थसंकल्पीय भाषण सुरू होताच संसदेत प्रचंड गोंधळ, अखिलेश यांनी महाकुंभ चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केलाअर्थसंकल्प सुरु होताच सपा खासदार अखिलेश यादव यांनी महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. निर्मला सीतारमण या संसदेत अर्थसंकल्पीय भाषण वाचत असतानाच सपा खासदारांनी सभात्याग केला आहे.
Budget 2025 Expectations Live : अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच संसदेत गोंधळअर्थसंकल्पात गरीब शेतकरी, महिला आणि तरुणांच्या दिलासा मिळणार का?
Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देणार प्रयागराजला भेटमहाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज जखमींना भेटण्यासाठी प्रयागराजला जाणार.
Mahakunbh 2025 live : उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि 73 देशांचे राजदूत आज महाकुंभात होणार सहभागीउपराष्ट्रपती जगदीप धनखड, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यातील अनेक मंत्री, जगातील 73 देशांतील सुमारे 116 राजदूत आणि प्रतिनिधी शनिवारी महाकुंभ मेळा परिसरात दाखल होत आहेत.
Mahayuti Politics : फडणवीस, शिंदे यांच्याविरुद्धच्या कटाची चौकशीसाठी 'SIT' ची स्थापनामहाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या कथित कट प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.
Sanjay Raut : संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकागेल्या दहा वर्षांत लक्ष्मी भाजपवाल्यांना प्रसन्न झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडवणाऱ्याच योजना सरकारने आणल्या आहेत. दहा वर्षांत लक्ष्मी गौतम अदानींवर प्रसन्न आहे. मोदी जेव्हा घोषणा करतात, तेव्हा सामान्यांच्या पोटात भीताचा गोळा येतो, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली.
Arvind Kejriwal : 'आप'च्या सात आणदारांचे राजीनामे; अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्कादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाच दिवस राहिले असतानाच, सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी राजीनामे दिले. पक्षाच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला असून, प्रमाणिक विचारसरणीपासून पक्ष दूर जात असल्याचे कारण देत आमदारांनी राजीनामा दिला आहे. पक्षाने मात्र राजीनामा देणाऱ्या आमदारांचे आरोप फेटाळले आहेत.
Sonia Gandhi : राष्ट्रपतींच्या अभिभाषणांवर सोनियांच्या विधानाने वादंगअभिभाषण वाचता वाचता राष्ट्रपती अखेरीस खूप थकल्या होत्या. त्यांना बिचाऱ्यांना बोलताही येत नव्हते, अशी टिप्पणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिय यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणानंतर केली. त्यावरून राजकीय वर्तुळात मोठा वादंग झाला आहे. 'बिचाऱ्या' या शब्दावरून सत्ताधारी भाजपने सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Balasaheb Thorat And Devendra Fadnavis : माजी मंत्री थोरात यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रसंगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक इथं प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा असून, संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेसह भौगोलिक रचनेला धक्का लागणार आहे. त्यातून जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिले असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी यांनी सांगितले.
Gas cylinder rates : बजेट सादर होण्यापूर्वी गॅस सिलेंडर झाले स्वस्तआज संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वीच LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यातील दर कपातीनुसार कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर 20 रुपयापेक्षा जास्त कमी झाले आहेत. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Rickshaw taxi fares are expensive : रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागलाआजपासून रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण रिक्षा टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागला आहे. त्यानुसार आजपासून रिक्षाचे भाडे किमान 26 रुपये, तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये असे असणार आहे.
Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणारकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आठवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहेत. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.