सीसीआय आणि खाजगी बाजाररातही कापसाला सारखाच भाव...
यावर्षी 7 हजार 521 रुपये कापसाला हमीभाव मिळालेला नाही.
देशांतर्गत सरकी आणि रुईचे भाव
स्थिरावल्याने कापूस बाजारपेठेत मोठी मंदी.
कापूस उत्पादक शेतकरी संकटात शेतकऱ्यांना कापसाच्या भावाची प्रतीक्षा..
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मार्गावर भाजप जात आहे - छगन भुजबळआम्ही भाजपासोबत आहोतच ना, मग जाण्याचा प्रश्न येतो कुठे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मार्गावर भाजप जात आहे. मंत्रालयात जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्या प्रतिमा लावणे, स्मारकाचे काम पुण्यात, नायगाव येथे सुरू आहे. ओबीसीच्या संरक्षणासाठी ते आमच्यासोबत आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.
Pune News: भारत सरकारच्या 'वीरगाथा ४.०' स्पर्धेत साधना विद्यालयाचा यश कित्तूर देशात पहिलाभारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू केलेल्या "वीरगाथा ४.०' प्रकल्पांतर्गत आयोजित स्पर्धेत येथील साधना विद्यालयाच्या नववीत शिकणाऱ्या यश लक्ष्मण कित्तूर या विद्यार्थ्याने देशात पहिला क्रमांक पटकावला.
तया स्पर्धेसाठी "राणी लक्ष्मीबाई माझ्या स्वप्नामध्ये आल्या; मी आपल्या देशाची सेवा करावी, अशी त्यांची इच्छा होती.' या सूचक विषयावर निबंध लेखन केले होते.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व दिनी राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याला दहा हजार रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Dagdusheth Halwai: दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात साजरा होतोय गणेशजन्म सोहळाप्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थी, गणेशजन्म सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात साजरा करण्यात येत आहे.
यानिमित्त मंदिराला आकर्षक आरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे...
मंदिरात आज पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला तर पहाटे ४ ते ६ यावेळेत स्वराभिषेक कार्यक्रम झाला सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे हा कार्यक्रम सादर केला..
त्यानंतर सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ यावेळेत गणपती सूक्त अभिषेक होणार आहे......
सकाळी ८ ते ११.३० ते दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत गणेशयाग होणार असून दुपारी १२ वाजता गणेशजन्माचा सोहळा होईल....
सायंकाळी ६ वाजता नगरप्रदक्षिणा मिरवणूक निघेल. रात्री ८.३० वाजता श्रींची महाआरती होईल आणि रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर करण्यात येणार आहे...
Pune News: पुणे जिल्ह्यात 303 शाळा मॉडेल करणार, सुविधांसाठी 417 कोटीचा आराखडा सादरशैक्षणिक दर्जा सुधारणार
खासगी शाळांच्या धरतीवर जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारावा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पहिली ते आठवीच्या जिल्ह्यातील तीनशे तीन शाळा मॉडेल स्कूल करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.........
या विषयाच्या 417 कोटी रुपयांचा आराखड्याचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले............
मॉडेल्स स्कूलमध्ये शाळांमध्ये भौतिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील.............
पुणे जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या 3 हजार 546 शाळा आहेत या शाळात 2 लाख 38 हजार 395 विद्यार्थी शिकतात..............
Sangli News: सांगली मार्केट यार्डात नवीन बेदाण्यास 225 रुपये भाव, तर मार्केटमध्ये 30 टन बेदाण्याची आवकचांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन बेदाणा सौद्यांचा प्रारंभ झाला आहे.
मुहूर्ताच्या सौद्यावेळी तब्बल 30 टन बेदाण्याचे आवक मार्केटमध्ये झाली आहे.
हिरव्या बेदाण्यास 225 रुपये दर तर पिवळ्या बाजाण्यास 191 रुपये प्रत्येक किलो असा भाव मिळाला आहे.
बेदाण्यास चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बेदाणा विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती यांनी केले आहे.
नवीन बेदाणा सौदयात 7 दुकानात 30 टन बेदाण्याची आवक झाली आहे.
तर यादव ट्रेंडर्स दुकानात मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील शेतकऱ्यांच्या हिरव्या बेदाण्यास 225 रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे.
वसंतदादा मार्केटमध्ये चालू वर्षाच्या हंगामातील बेदाण्याचा प्रारंभ करण्यात आला यावेळी बेदाणाला हा दर मिळाला आहे.
Jalna News: जालना जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेतजालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं होतं...
त्या नुकसानी कोटी शासनाकडून 412 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला तरीही हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही.
तहसील स्तरावरून याद्या अपलोड करण्यास दिरंगाई होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल अडीच लाख शेतकरी हे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.
आतापर्यंत केवळ 41 हजार 368 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या असून उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होण्यासाठी दिरंगाई होत असल्याने हे शेतकरी या अनुदानाची मोठ्या आशेने प्रतीक्षा करत आहे.
त्यामुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार असा सवाल
Pankaja Munde : पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना जिल्हा दौऱ्यावरराज्याच्या पर्यावरण वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना जिल्हा दौरावर आहेत.
सकाळी 11 वाजता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जालना जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे.
बैठकीनंतर पंकजा मुंडे ह्या जालना जिल्हा भाजप कार्यालयाला देखील भेट देणार आहे.
Pune News: पुणे नगर महामार्गावर शिक्रापुर पोलीसांची गांजा तस्करांवर मोठी कारवाईशिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ सह पोलिसांनी 53 किलो गांजा जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 19 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.