अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बजेट चांगलं असल्यानं सगळे तुमचं कौतुक करतायत असं म्हटलं.
Union Budget 2025 Live Update : करदात्यांसाठी मोठी घोषणा, 12 लाखापर्यंत कोणताही कर नाही१२ लाख रुपयांपर्यंत कर लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा कर रचना कशी?
४ ते ८ लाख रुपयांवर ५ टक्के
८ ते १२ लाख रुपयांवर १० टक्के
१२ ते १६ लाख रुपयांवर १५ टक्के
१६ ते २० लाख रुपयांवर २० टक्के
२० ते २४ लाख रुपयांवर २५ टक्के
२४ पेक्षा जास्त ३० टक्के
Union Budget 2025 : आयकर भरण्याच्या मुदतीची मर्यादा वाढवलीरिटर्न न भरलेल्यांना ४ वर्षांची मुदत मिळेल. इन्कम टॅक्समध्ये दंडापेक्षा न्याय देण्यावर भर दिला जाणार आहे.
Union Budget : ज्येष्ठ नागरिकांना करात दुप्पट सूटआयकरात मिडल क्लासवर फोकस असेल
सिनियर सिटिझनसाठी करातून दुप्पट सूट
भाड्याची वार्षिक टीडीएस मर्यादा वाढवून ६ लाख रुपये इतकी करण्यात आलीय.
टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मर्यादा ४ वर्षापर्यंत वाढवण्यात आलीय.
आयकर नियम सोपे केले जातील
Union Budget : एलईडी, एलसीडी टीव्हीवर सीमा शुल्क एलसीडी आणि एलईडी टीव्हीच्या सीमा शुल्कात कपातकमी करून ते अडीच टक्के केलं जाईल. यामुळे इलेक्ट्रिक वस्तूंचे दर कमी होतील. लिथियम आयन बॅटरी स्वस्त होईल. यामध्ये सरकारकडून गुंतवणूक केली जाणार आहे.
Union Budget Update : कॅन्सरसह गंभीर आजारांवरील औषधं स्वस्त होणारकर्करोग आणि गंभीर आजारांवर देण्यात येणाऱ्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्यात येणार आहे. सीमा शुल्कातून ३६ औषधं वगळण्यात आली आहेत.
Union Budget Update : नवं इन्कम टॅक्स विधेयक येणार, अर्थमंत्री सितारामन यांची घोषणापुढच्या आठवड्यात नवं इन्कम टॅक्स धोरण येणार आहे. आयकराच्या नियमात मोठे बदल होणार असल्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले.
Union Budget : वित्तीय तूट कमी करणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामनआर्थिक वर्ष २०२५ साठी वित्तीय तूट ४.८ टक्क्यांपर्यंत राखण्याचं लक्ष्य असणार आहे. तर आर्थिक वर्ष २०२६ साठी वित्तीय तूट ४.४ टक्के इतकं ठेवण्याचं लक्ष्य आहे.
Union Budget Live : नव्या IIT उभारणार, IITमध्ये ६५०० जागा वाढवणारदेशात नव्या आयआयटी उभा केल्या जातील. पटना आय़आयटीची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीय. आयआयटीच्या जागा 6500 पर्यंत वाढवल्या जातील. २०१६ नंतर सुरू झालेल्या आयआयटीमध्ये जास्त विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या जातील याकडे लक्ष देण्यात येईल.
Union Budget 2025 : व्हिसाची पद्धत सोपी करणारभारतात उपचार घेण्याची इच्छा असणाऱ्यांना मेडिकल व्हिसा दिला जाणार. व्हिसा देण्याची पद्धत सोपी करणार.
खासगी क्षेत्रात संशोध आणि विकासासाठी २० हजार कोटींच्या निधीची तरतूद Union Budget 2025 : पर्यटन क्षेत्रासाठी मोठी घोषणा, ५० टुरिजम साइट तयार करणारटुरिझम साइटसाठी राज्यांना जमीन देणार, राज्यांसोबत मिळून ५० टुरिजम साइट तयार करणाय, पर्यटन क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली. धार्मिक स्थळांसाठी विशेष पथक स्थापन करणार. खासगी क्षेत्रांसोबत मिळून मेडिकल टुरिजमवर भर दिला जाईल.
Union Budget 2025 : कनेक्टिविटी वाढवण्यासाठी नवी योजना, 120 शहरं जोडली जाणारदेशांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नव्या योजना
उडान योजनेंतर्गत विभागीय कनेक्टिव्हिटी वाढवली जाईल.
नव्या उडान योजनेत १२० नवी शहरं जोडली जातील.
Union Budget Update : SC/ST महिलांसाठी नवी घोषणा, 10 हजार कोटींची तरतूदएससी एसटी महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आलीय. ५ वर्षांसाठी ही योजना असणार आहे. एसएसी, एसटी प्रवर्गातील महिलांना या योजनेतून मदत मिळणार आहे. ५ लाख महिलांना याचा लाभ होईल. यासाठी १० हजार कोटींचा नवा निधी दिला जाईल.
इन्फ्रा डेव्हलपमेंटसाठी राज्यांना मोफत कर्ज दिलं जाणारइन्फ्रा डेव्हलपमेंटच्या माध्यमातून राज्यांना मोफत कर्ज दिलं जाईल. इन्फ्रा डेव्हलपमेंटसाठी १.५ लाख कोटींचं कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
एआय एक्सिलन्स सेंटर उभारले जातील. एआय शिक्षणासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलीय.कृषी आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर वाढवण्यात येणार. सर्व सरकारी रुग्णालयात डेकेअर कॅन्सर सेंटर असतील. २०० डेकेअर कॅन्सर सेंटर उभारले जाणार आहेत. Union Budget : नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशनची घोषणानॉन लेदर चपलांना सपोर्टसाठी योजना आणणार. भारतीय खेळण्यांसाठी योजना येईल. मॅन्युफॅक्चरिंग मिशनमध्ये क्लीन टेकला प्रोत्साहन दिलं जाईल. ईव्ही बॅटी, विंड टर्बाइन मॅन्युफॅक्चरिंगवर भर दिला जाणार आहे.
Union Budget Live Update : किसान क्रेडिट कार्डवर कर्जमर्यादेत वाढकिसान क्रेडिट कार्डवर कर्जमर्यादा वाढवण्यात आलीय. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. तसंच आसाममध्ये यूरिया सयंत्र उभारले जाईल. यूरियाचा पुरवठा वाढवण्यासाठा आसाममध्ये मोठा प्रोजेक्ट उभारण्यात येईल.
स्टार्टअप क्रेडिट गँरंटी 20 लाखापर्यंत वाढवली, १० लाख क्रेडिट कार्ड जारी करण्यात येणार किसान क्रेडीट कार्डवर कर्ज मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढ Union Budget : कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा१०० जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना. शेतकऱ्यांना योग्य दर देणार.
तूर उडीद मसूर कडधान्याचं ६ वर्षांचं मिशन
कॉटन प्रोडक्शनसाठी ५ वर्षांची मोहिम सुरू केली जाणार आहे.
पूर्व भारतात यूरिया प्लांट सुरू करण्याची घोषणा करण्यात आली
Union Budget Live Update : कृषी क्षेत्रासाठी विशेष घोषणापीएम कृषी योजनेत युवा आणि महिलांवर फोकस
निर्यातीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
राज्यासोबत मिळून कृषी क्षेत्राचा विकास होणार
शेतीचं उत्पन्न वाढवण्यावर भर
कृषी क्षेत्रात पीए धनधान्य योजना १.७ कोटी लोकांना फायदा होणार
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात दहा क्षेत्रांवर फोकसअर्थसंकल्पात ग्रोथ वाढवण्यावर भर असेल. तसंच गुंतवणुकीवर लक्ष केंद्रीत केलं जाईल
Union Budget 2025: अर्थसंकल्प सादर करताना सपा खासदारांची घोषणाबाजीअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणाला सुरुवात होताच समाजवादी पार्टीच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. महाकुंभ मेळ्याच्या मुद्द्यावरून सपा खासदारांनी घोषणा दिल्या.
अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरुवात, विरोधकांची घोषणाबाजीलोकसभेत अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरुवात झालीय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात अर्थसंकल सादर करतील.
Union Budget : अर्थसंकल्पाकडून आम्हाला काही अपेक्षा नाही : काँग्रेस खासदार जयराम रमेशकाँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी अर्थसंकल्पाकडून आम्हाला काही अपेक्षा नसल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की, अर्थसंकल्पात इंटेंट आणि कंटेंट असतो. आता सरकार मध्यम वर्गासाठी काय करणार हे पाहू.
राष्ट्रपती मुर्मूंनी अर्थमंत्री सीतारामन यांना खायला दिलं दही साखरअर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थमंत्री सितारामन यांना दही-साखर खायला दिली.
Union Budget 2025 Live Updates : केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरीकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्प २०२५-२६ ला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत मंत्रिमंडळ बैठक सुरू आहे.
Union Budget 2025 : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पाची कॉपी सादर करणार अर्थमंत्रीअर्थसंकल्प सादर होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक सुरू झाली असून या बैठकीत अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पाची कॉपी सादर करतील. मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पावर शिक्कामोर्तब होईल.
Union Budget 2025 Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी संसदेकडे रवाना.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करणार आहेत. राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला संसदेत सुरुवात झालीय.
Union Budget 2025 Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज #UnionBudget संसदेत सादर करणार आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना त्यांच्या अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वी प्रथागत 'दही-चीनी' (दही आणि साखर) खायला दिली.
अर्थसंकल्पाच्या भाषणाची डिजिटल कॉपी सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर वाचता येणार आहे. www.indiabudget.gov.inवर इंग्रजी, हिंदीसह वेगवेगळ्या भाषांमध्ये अर्थसंकल्पाचं भाषण वाचण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
Union Budget 2025 Live Updates: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत पोहोचले.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत #UnionBudget2025 सादर करणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हाणाले "अर्थसंकल्प सादर केला जाईल, तो समाजातील प्रत्येक घटकासाठी असेल."
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत Union Budget 2025 वर म्हणाले, "बजेट चांगले असेल असेल, देशाच्या कल्याणासाठी, गरिबांच्या कल्याणासाठी आणि देशाला विकसित करणार बजेट असणार आहे"
Union Budget 2025 Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.अर्थसंकल्पाची प्रत संसद भवनात पोहोचली
केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रत संसद भवनात पोहोचली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आपला आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Union Budget 2025 Live Updates: आम्हाला अर्थसंकल्पाकडून कोणतीही अपेक्षा नाही- काँग्रेस नेते संदीप दीक्षितकाँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, "आम्हाला अर्थसंकल्पाकडून कोणतीही अपेक्षा नाही. ते 10 -11 वर्षांपासून अर्थसंकल्प सादर करत आहेत आणि त्यांनी काहीही ठोस काम केलेले नाही. त्यांच्या मित्रांना, मोठ्या भांडवलदारांना दिलासा देण्यासाठी ते काम करत आहेत... दिल्लीत निवडणुका असल्याने ते काही आश्वासनांद्वारे लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकतात..."
भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी Union Budget2025 वर सांगितले की, "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, सर्वसमावेशक विकासाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन, जनतेला आणि देशाला दिलासा देणाऱ्या अनेक तरतुदी अर्थसंकल्पात असतील अशी पूर्ण अपेक्षा आहे. व्यवसाय आणि अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भरभराटीला येईल. अशी आम्हाला आशा आहे"
Union Budget 2025 LIVE updates : ओडिशा: वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 वर वाळूचे शिल्प तयार केले.मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. याआधी त्यांनी दोन वेळा अंतरिम बजेटही सादर केलंय.
Nirmala Sitaraman : अर्थमंत्री सीतारमण पोहोचल्या अर्थमंत्रालयातकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थ मंत्रालयात पोहोचल्या आहेत. तिथून त्या राष्ट्रपती भवनात जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अर्थसंकल्पाला मंजुरी देतील. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पावर शिक्कामोर्बत झाल्यानंतर अर्थमंत्री सीतारमण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिला टप्पा ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. या काळात ९ बैठका होणार आहेत. तर दुसरा टप्पा १० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होईल.
Budget 2025 News LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज अर्थसंकल्प सादर करणारकेंद्रीय अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प सादर करणार असून यात मोठ्या घोषणांची अपेक्षा केली जात आहे. सर्वसामान्यांपासून कार्पोरेट क्षेत्राचं बजेटकडे लक्ष आहे. महागाई आणि टॅक्समधून दिलासा मिळण्यासाठी मोठ्या घोषणांची शक्यता व्यक्त केली जातेय. करात सूट दिली जाईल अशी अपेक्षा करदात्यांना आहे.