शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड सुरुच, गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी बुडाले, सोने दराचा नवा विक्रम
Marathi February 04, 2025 11:24 AM

नवी दिल्ली: अर्थसंकल्पानंतरच्या शेअर बाजाराच्या पहिल्या नियमित सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स  319 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये 121 अंकांची घसरण झाली. यामुळं गुंतवणूकदारांचे तब्बल 4 लाख कोटी बुडाले. शेअर बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची निवड केली. त्यामुळं  सोन्याच्या दरानं 85300 रुपयांपर्यंत झेप घेतली.   

सेन्सेक्स अन् निफ्टी का घसरली?

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्यापारी भागीदार देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर टॅरिफ लादण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. मेक्सिकोवर टॅरिफ लादण्याचा निर्णय एक महिना लांबणीवर टाकण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळं आशियाई देशांचं चलन घसरलं. भारताच्या शेअर बाजारात देखील घसरण पाहायला मिळाली. भारतीय गुंतवणूकदारांचे  4.29 लाख कोटी रुपये बुडाले.  

शेअर बाजारातील घसरणीमुळं बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचं बाजारमूल्य  4,29,823.69 कोटींवरुन 4,19,54,829 कोटी रुपयांवर आलं. सेन्सेक्स 319.22 अंकांनी घसरुन  77186.74 अंकांवर बंद झाला. एनएसई निफ्टी देखील  121.10 अकंांनी घसरुन 23361.05 वर बंद झाली.

सोन्याचे दर विक्रमी पातळीवर 

नवी दिल्लीतील सर्राफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ होऊन ते 85300 रुपयांवर पोहोचलं. अखिल भारतीय सर्राफा संघाकडून ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत असल्यानं सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 84900 रुपे होते.  सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आणि सोनं 85300 रुपयांवर पोहोचलं.  चांदीचे दर देखील 96000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. 

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मोठी घसरण झाली. आता आपल्याला अमेरिकेचा एक डॉलर घ्यायचा असेल तर 87.17 रुपये मोजावे लागतील. कॅनडा, मेक्सिको, चीन यांच्यावर अमेरिकेनं उच्च टॅरिफ लादल्यानंतर जागतिक बाजारावर परिणाम झाला.  जागतिक पातळीवर सोन्याचे दर 7.50 डॉलर घसरुन  2827.50 प्रति औंस इतका झाला.डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं डॉलर गेल्या तीन आठवड्यामधील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. 

शेअर बाजारात आज काय होणार? 

भारतीय शेअर बाजारातून जानेवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 70000 कोटी रुपये काढून घेतले होते. सोमवारी भारतीय शेअर बाजारात झालेल्या घसरणीनं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. तब्बल 4 लाख कोटी रुपयांचं गुंतवणूकदारांना नुकसान झालं. आजच्या सत्रात शेअर बाजारात तेजी पाहायला मिळणार का हे पाहावं लागेल. 

इतर बातम्या : 

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/photo-gallery/business/ipo-chamdate-chamunda-elticles-ipo-Open-today- for-close-on-6-februre- gmp-SURUSES-SURGES-SURGES-SURGES-SURGES-SURDES-SURDES-SURDES-SURDES-SURDES-SURDES-SURDES-SURDES-SURDES-">IPO Update:चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी खुला होणार, किंमतपट्टा फक्त 50 रुपये, GMP कितीवर?

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.