Latest Marathi News Updates : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; दिल्लीत उद्या मतदान, आठ तारखेला होणार मतमोजणी
esakal February 04, 2025 01:45 PM
Trees Fire : सांगली फाटा येथील झाडांना अचानक आग

शिरोली पुलाची : सांगली फाटा येथील पेट्रोल पंपाच्या बाजूस सेवामार्गालगत असणाऱ्या झाडाला रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत आजूबाजूच्या रिकाम्या जागेतही फैलाव केला. महापालिका अग्निशमन दलाच्या गाडीने आग आटोक्यात आणली. परंतु, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Delhi Assembly Elections LIVE : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; दिल्लीत उद्या मतदान, आठ तारखेला होणार मतमोजणी

Latest Marathi Live Updates 4 February 2025 : आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या. विधानसभेच्या ७० जागांसाठी येत्या पाच तारखेला मतदान होत असून आठ तारखेला मतमोजणी होणार आहे. तसेच राज्यात गेल्या वर्षी नव्याने आखण्यात आलेले ‘मराठी भाषा धोरण’ केवळ बासनात बांधले जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने मराठी भाषा व्यवहारात आणण्यासाठी स्वत:पासूनच सुरुवात केली आहे. मंत्रालयापासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांत मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याची शंका व्यक्त करताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले. त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी थंडीचा कडाका आहे तर, काही भागांत थंडी कमी झालेली दिसत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.