Stock Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 1,400 अंकांनी वाढला, तर निफ्टी 23,700च्या वर
esakal February 04, 2025 09:45 PM

Stock Market Closing Today: आज मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. 2 दिवसांच्या घसरणीनंतर, आज दिवसभरात चांगली वाढ झाली. निफ्टी 378 अंकांच्या वाढीसह 23,739 वर बंद झाला. सेन्सेक्स 1397 अंकांनी वाढून 78,583 वर बंद झाला. बँक निफ्टी 947 अंकांच्या वाढीसह 50,157 वर बंद झाला.

आजच्या व्यवहारात श्रीराम फायनान्स, एल अँड टी, अदानी पोर्ट्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि इंडसइंड बँक निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तर ट्रेंट, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, हिरो मोटोकॉर्प, नेस्ले इंडिया आणि आयशर मोटर्स सर्वाधिक घसरले.

Stock Market Closing

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडातून येणाऱ्या वस्तूंवर लादण्यात आलेले अतिरिक्त शुल्क तात्पुरते थांबवण्याची घोषणा केली. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता कमी झाली. यापूर्वी, व्हाईट हाऊसने कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयातीवर अतिरिक्त 25% आणि चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 10% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे जागतिक व्यापार युद्धाचा धोका निर्माण झाला होता.

Stock Market Closing गुंतवणूकदारांनी 5.7 लाख कोटी कमावले

BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 4 फेब्रुवारी रोजी वाढून 425.24 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 3 फेब्रुवारी रोजी 419.54 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 5.7 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 5.7 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

BSE SENSEX कोणते शेअर्स वाढले?

आज BSE 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स हिरव्या रंगात म्हणजेच वाढीसह बंद झाले. यामध्ये लार्सन अँड टुब्रोच्या (L&T) शेअर्समध्ये सर्वाधिक 4.76 टक्के वाढ झाली आहे. यानंतर अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (आरआयएल) शेअर्स वाढीसह बंद झाले.

तर उर्वरित सेन्सेक्सचे 6 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. त्यातही आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स 4.16 टक्क्यांनी घसरले. तर झोमॅटो, नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्सही घसरले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज वाढीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 4,073 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2,511 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,407 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

तर 155 कोणतीही हालचाल न करता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 66 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 84 शेअर्सनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.