कंपनी प्रत्येक शेअरवर देणार १५० रुपये लाभांश, डिसेंबर तिमाहीत नफा २०५ कोटीवर
ET Marathi February 06, 2025 10:45 AM
मुंबई : भारतात जॉकी इनरवेअरसाठी विशेष परवाना असलेली कंपनी पेज इंडस्ट्रीज लिमिटेडने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच कंपनीने २०२५ आर्थिक वर्षासाठी तिसरा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने भागधारकांना मोठा लाभांश जाहीर केला आहे. या लाभांशाची रेकॉर्ड तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पेज इंडस्ट्रीज लिमिटेडने भागधारकांना प्रति शेअर १५० रुपये इतका तिसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. या लाभांशाची रेकॉर्ड तारीख १३ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे. तर पेमेंट ७ मार्च २०२५ पर्यंत केले जाईल. या घोषणेसह पेज इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत प्रति शेअर ७०० रुपये लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळ त्यांच्या गुंतवणूकदारांना अतिरिक्त नफा मिळेल. कंपनीने यापूर्वी प्रति शेअर २५० रुपये आणि ३०० रुपयाच आणखी दोन अंतरिम लाभांश जाहीर केले होते.चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत पेज इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा ३५ टक्क्यांनी वाढून २०५ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत १५२ कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचा एकूण महसूल ७.२ टक्क्यांनी वाढून १,३१३ कोटी रुपये झाला. कंपनीचा ऑपरेटिंग नफा (EBITDA) ३४ टक्क्यांनी वाढून ३०२.६ कोटी रुपये झाला. EBITDA मार्जिन देखील ५ टक्क्यांनी वाढून २३% झाला, जो मागील वर्षी १८.४ टक्के होता. तिमाही निकालांनंतर ५ फेब्रुवारी रोजी पेज इंडस्ट्रीजचे शेअर्स १,१०९ रुपयानी घसरून ४५,७९८ रुपयावर बंद झाले.