Maharashtra Live Update : खासदारकी वाचली, वर्षा गायकवाडांविरोधातील निडवणूक याचिका फेटाळली
Sarkarnama February 06, 2025 05:45 PM
Varsha Gaikwad : खासदारकी वाचली, वर्षा गायकवाडांविरोधातील निडवणूक याचिका फेटाळली

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात दाखल मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. असिफ सिद्दीकी यांनी ही याचिका दाखल केली होती. गायकवाड यांनी निवडणूक प्रचारात गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने ही याचिका फेटाळली.

Nagpur Bird Flu : कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळेच झाल्याचा रिपोर्ट आला समोर

नागपूर भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था आनंदनगर भोपाळ तसेच रोग अन्वेषण विभाग पुणे यांनी नागपूर येथील मोठा ताजबाग या परिसरातील कुक्कुट पक्षांचे नमुने फ 5 ळ 1 या एव्हीयन इन्फ्लुएंझा ( बर्ड फ्ल्यू) विषाणूसाठी पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठा ताजबाग नागपूर शहरासह आसपासच्या एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. नागपूरच्या ताजबाग परिसरात एका व्यक्तीच्या घरातील तीन कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर पशु संवर्धन विभागाकडून केलेल्या तपासणीनंतर भोपाळच्या 'राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग प्रयोगशाळे"च्या अहवालात कोंबड्यांचे मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे.

GBS syndrome : 'जीबीएस' रुग्णसंख्या 170 वर, पुणेकरांच्या टेन्शनमध्ये वाढ

पुण्यातील गुलियन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाकडून पाणी, चिकनच्या नमुन्यांच्या तपासणी केली जात आहे. तरीही रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 170 वर पोहोचली आहे. यापैकी 61 रुग्ण ICU मध्ये आहेत तर 20 व्हेंटिलेटरवर आहेत.

School bus : स्कूल बसचा प्रवास महागला

नवीन शैक्षणिक वर्ष 2025 मध्ये पालकांना शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूल बससाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. कारण वाढत्या इंधन, बसच्या देखभाली खर्चाच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस मालकांनी शालेय बस शुल्कात 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्य सरकारने सरकारी बस भाड्यात 14.95 टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आता पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Ganesh Naik : ठाणे आपल्या सगळ्यांचंच आहे - गणेश नाईक

राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख मंत्री म्हणून नेमणूक होताच महायुतीतील सगळे मंत्री कुठेही दरबार घेऊ शकतात असं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, "मी पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे दरबार घ्यावा." तसंच ठाणे हे आपल्या सगळ्यांचं आहे. ठाण्यात काय अडीअडचणी आल्या तर संबंधित अधिकाऱ्यांना देखील आपण बोलू, असंही ते म्हणाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.