टीम इंडियाचा मिडल ऑर्डरमधील यशस्वी फलंदाज श्रेयस अय्यर याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विस्फोटक खेळी केली. श्रेयसने 6 फेब्रुवारीला नागपूरमधील व्हीसीए स्टेडियममध्ये 249 धावांचा पाठलाग करताना निर्णायक क्षणी 59 धावांची विंध्वसक खेळी केली. श्रेयसच्या या खेळीमुळे टीम इंडियावर असलेला दबाव कमी झाला. श्रेयस टीम इंडियाची 2 बाद 19 अशी स्थिती असताना मैदानात आला. त्यानंतर श्रेयसने शुबमन गिल याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची निर्णायक भागीदारी केली, ज्यामुळे सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकला.
श्रेयसने 6 बॉलमध्ये 9 फोर आणि 2 सिक्ससह स्फोटक खेळी केली. श्रेयसने इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडून काढत चौफेर फटकेबाजी केली. श्रेयसचा हा टीम इंडियासाठी 6 महिन्यांनंतरचा पहिला सामना होता. श्रेयसने या सामन्यानंतर एक खुलासा केला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. श्रेयसचं या सामन्यात खेळणं नक्की नव्हतं. टीम मॅनेजमेंट श्रेयसला संधी देणार नव्हती. मात्र विराट कोहलीमुळे श्रेयसला संधी मिळाली. श्रेयसला बुधवारी 5 फेब्रुवारीला नेट्समध्ये गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे विराटला पहिल्या सामन्याला मुकावं लागलं. त्यामुळे विराटला फिटनेस टेस्टमध्येही पास होचा आलं नाही. त्यामुळे विराटच्या जागी श्रेयसला संधी मिळाली.
जर विराट फिट असता तर त्याला संधी मिळाली नसती, असं श्रेयसने सामन्यानंतर ब्रॉडकास्टर्ससह बोलताना म्हटलं. “हे फार मजेशीर आहे. मी कॉल रात्री सिनेमा पाहत होतो. मी विचार केला की रात्री उशीराने झोपू शकतो. मात्र तेव्हा कॅप्टनचा (रोहित शर्मा) कॉल आला म्हटलं की तु खेळू शकतो कारण विराटच्या गुडघ्याला दुखापत आहे. मी त्यानंतर माझ्या रुमच्या दिशेने धावत गेलो आणि झोपलो”, असं श्रेयसने म्हटलं.
श्रेयसने सामन्यानंतर काय सांगितलं?
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.