मोठी बातमी, आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटने कपात, कर्ज स्वस्त होणार
Marathi February 07, 2025 02:24 PM

आरबीआय एमपीसी बैठक 2025 रेपो रेट कट नवी दिल्ली : आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरणाविषयासंदर्भात माहिती दिली. पतधोरण विषयक समितीची बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पडली. पतधोरण समितीच्या बैठकीकडे देशातील लोकांचं मोठ्या प्रमाणावर लक्ष लागलं आहे. पतधोरणातील बैठकीतील घोषणांसह गव्हर्नरचं वक्तव्य आरबीआयसाठी महत्त्वाचं असतं, असं संजय म्हलोत्रा म्हणाले. आरबीआयच्या पतधोरण समितीनं एकमतानं  25 बेसिस पॉइंटनं कमी करण्याचा निर्णय घेतला. 6.25 टक्के रेपो रेट असेल, असं संजय म्हलोत्रा म्हणाले. आरबीआयचे गव्हर्नर म्हणून संजय म्हलोत्रा यांनी पहिलं पतधोरण जाहीर करताना हा मोठा निर्णय जाहीर केला. आरबीआयच्या गेल्या सात पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला होता.

आरबीआय विविध मुद्यांवर पतधोरणात मुद्यांवर भाष्य करते, असं संजय म्हलोत्रा म्हाले. भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे, असंही त्यांनी म्हटलं.

जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरण आव्हानात्मक आहे. ऐतिहासिक सरासरीपेक्षा कमी दरानं जागतिक अर्थव्यवस्थेत वाढ होतेय.  अमेरिकेनं व्याज दर कपात केली नाही. अमेरिकेनं डॉलर मजबूत होत आहे. यील्ड बॉंड्स मजबूत होते, याच विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला, असं संजय म्हलोत्रा यांनी सांगितलं.  मात्र, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं संजय म्हलोत्रा म्हणाले. भारतीय रुपया घसरण होत असल्याचं आपण पाहतोय पण विविध आव्हानांचा सामना करण्यास आरबीआय सज्ज असल्याचं संजय म्हलोत्रा म्हणाले.

आरबीआयच्या पतधोरण समितीनं एकमतानं रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं घटवून 6.25 टक्के करत असल्याचं संजय म्हलोत्रा म्हणाले. एसडीएफ रेट 6.0 टक्के असेल. एमसीएफ आणि बँक रेट 6.5 टक्के असेल. एमपीसीएनं एकमतानं तटस्थ भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. महागाईचा नियंत्रित करताना आर्थिक विकासावर भर देण्याचं धोरण स्वीकारल्याचं संजय म्हलोत्रा म्हणाले.

पतधोरण समितीनं महागाई कमी झाल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे.  अन्न पदार्थांच्या किमतींचा आढावा आणि मागील एमपीसीच्या निर्णयांचा परिणाम असेल.

पतधोरण समितीनं विकास वाढीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं पतधोरणामध्ये 25 बेसिस पाईंटची कपात करण्याचा निर्णय घेतला. आरबीआयच्या पतधोरण समितीचं जागतिक घडामोडींवर लक्ष असेल, असं संजय म्हलोत्रा म्हणाले.

पहिल्या अंदाजानुसार रिअल जीडीपी दर 6.4 अंदाजित होता. गेल्या वर्षी 8.2 टक्के दर होता. येत्या काळातील आर्थिक घडामोडी, कृषीक्षेत्रात रब्बीत चांगल्या पिकांची अपेक्षा आहे, उत्पादन क्षेत्रात देखील वाढीची शक्यता आहे. सेवा क्षेत्र चांगली कामगिरी करत आहे. ग्रामीण भागातील मागणी वाढत आहे, असं संजय म्हलोत्रा म्हणाले.  रोजगार  वाढत आहे, केंद्राच्या अर्थसंकल्पात करसवलत देण्यात आलीय, उद्योगाकडून चांगल्या आशा आहेत, गुंतवणूक वाढण्यासाठी सरकार प्रयत्नशील दिसते, असं संजय म्हलोत्रा यांनी म्हटलं. या सर्वांचा विचार करुन रिअल जीडीपी रेट पुढील वर्षात जीडीपी पहिल्या तिमाहीत 6.7 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 7 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6.5 राहील असा अंदाज संजय म्हलोत्रांनी व्यक्त केला.

इतर बातम्या :

RBI Repo Rate Cut: रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात कपातीच्या घोषणेकडे लक्ष, मध्यमवर्गाला दिलासा मिळणार?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.