चिखली : भरधाव बोलेरोने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. शहरात ३ फेब्रुवारीला ही घटना घडली.गीता अनिल सोळंकी (३८) असे मृत महिलेचे नाव आहे.
हरिओम नगर मधील रहिवासी गीता सोळंकी या बाजारातून वडिलांच्या दुचाकीवर मागे बसून घराकडे निघाल्या होत्या.
उजव्या बाजूला असलेल्या घराकडे वळत रस्ता ओलांडत असतानाच पाठीमागून आलेल्या बोलेरो गाडीची दुचाकीला धडक बसली. या अपघातात गीता सडकेवर कोसळून गंभीर जखमी झाल्या.
नातलगांनी त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू-सासरे, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी येवता येते ४ फेब्रुवारीच्या दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.