गुलदस्ता- भेटी अशा घडाव्या…
Marathi February 09, 2025 08:24 AM

>> अनिल हार्दिकार

भेटी कशा आणि कुठे घडाव्या हे नियती ठरवत असते. किशोर कुमार या बहुगुणी आणि हरफन मौला कलाकाराची सचिन देव बर्मन यांच्याशी घडलेली भेट त्यांच्यातील संगीत, गायकीला अधिक समृद्ध करणारी ठरली.

सचिन देव बर्मन हे संगीतकार म्हणून ख्यातकीर्त असले तरी त्यांनी हिंदी चित्रपटातूनदेखील निवडक गाणी गायलेत आणि ती लोकप्रिय ठरली आहेत. उदाहरणार्थ, सुनो मेरे बंधू रे, ओ रे मांझी, वहाँ कौन है तेरा, डोली में बिठाई के, मेरी दुनिया है माँ, सफल होगी तेरी आराधना, प्रेम की पुजारी ही गाणी. सचिन देव बर्मन हा संगीतकार देव आनंदचा लाडका संगीतकार आणि त्यामुळे देव आनंदच्या नवकेतनसाठी सचिन देव बर्मन यांचे संगीत अफसर, बाज़ी, टॅक्सी ड्रायव्हर, हाऊस नं.44, फंटुश, नौ दो ग्यारह, काला पानी, काला बाजार, तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थीफ, प्रेम पुजारी, तेरे मेरे सपने, छुपा रुस्तम या चित्रपटांना होते. एवढेच नव्हे तर हरे राम हरे कृष्णसाठी देखील देव आनंदने विचारणा केल्यावर सचिन देव बर्मन यांनी स्वत राहुल देव बर्मनचे नाव सुचवले होते. साहजिकच किशोर कुमार हा देव आनंदचा आवाज झाला.

किशोर कुमार हा बहुगुणी आणि हरफन मौला कलाकार. तो काय नव्हता? निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक, अभिनेतादेखील. गायक म्हणून त्याने त्याचे श्रेष्ठत्व अनेकदा सिद्ध केले. फिल्मफेअर हा मानाचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट गायक या पुरस्कारासाठी तब्बल 27 वेळा त्याचे नामांकन झाले आणि 8 वेळा तो पुरस्कार त्याने पटकावला. ‘दिल ऐसा किसीने मेरा तोड़ा’ (अमानुष ), ‘खइके पान बनारसवाला’ (डॉन), हजार राहें (थोडी सी बेवफाई), के पग घुँघरू (नमक हलाल), हमें और जीने की चाहत (अगर तुम ना होते), मंझीले अपनी जगह है (शराबी), सागर किनारे (सागर). या पुरस्कारांची सुरुवात झाली होती ती ‘आराधना’ या चित्रपटातील ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्याने.

‘आराधना’ या हिंदी चित्रपटातील पहिल्या सुपरस्टार राजेश खन्ना अभिनित चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेल्या, सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी किशोर कुमारला नावारूपाला आणले असले तरी त्या दोघांची भेट बरीच  आधी झाली होती.

फिल्मिस्तानच्या ‘आठ दिन’ (एट डेज)वर सचिन देव बर्मन काम करत होते. अशोक कुमार अर्थात दादा मुनी यांचा किशोर कुमार हा धाकटा भाऊ. तो कॉलेजची परीक्षा संपवून दादामुनींबरोबर फिल्मिस्तान स्टुडिओत आला होता. किशोर कुमार सचिन देव बर्मन यांच्या गायकीचा चाहता होता. सचिन देव बर्मन यांनी गायलेली गाणी किशोर कुमार चार आणे घेऊन गाऊन दाखवत असे आणि वाहवा मिळवत असे. परीक्षा झाल्यानंतर किशोर कुमार दादामुनींकडे  हट्ट धरून बसला की मला सचिन देव बर्मन यांच्याकडे घेऊन चला. दादामुनी किशोरला  बर्मनदांकडे घेऊन गेले आणि त्यांना म्हणाले, “हा माझा धाकटा भाऊ. हा चांगला गातो. याचं गाणं तुम्ही ऐकून घ्यावं असं मला वाटतं.’’ किशोरने गायलेले गाणे सचिन देव बर्मन यांनी ऐकले. त्यांना त्याच्या आवाजात रियाजाचा अभाव जाणवला. तो आवाज अधिक सुरात लागणे गरजेचे होते. पण किशोर कुमार याला असलेली ईश्वरदत्त आवाजाची देणगी सचिन देव बर्मन यांनी ओळखली होती आणि त्याच एका बैठकीत किशोर कुमारला चित्रपटात गाण्याची संधी देण्याचा त्यांनी निश्चय केला आणि ते दादामुनींना म्हणाले की, किशोर कुमारला आता कॉलेजला पाठवण्याची गरज नाही. सचिन देव बर्मन किशोर कुमारला म्हणाले, “तुमी गान करो? शुनी तोमार गान!’’ (तू गाणं म्हणतोस? ऐकव बघू तुझं गाणं) अशी सचिन देव यांची आज्ञा मिळताच  किशोर कुमार यांनी सचिन देव बर्मन यांनीच गायलेले एक गाणे गायला सुरुवात केली. ‘कौन नगरिया जाओ रे…बंसीवाले’

सचिन देव बर्मन अभ्यासक्रम बनला. तो म्हणाला, “हो हो ए., कॉन्फिगर करा! वंदूर अनुसरण करा! आमच्याकडे निश्चित चान्सस आहेत. ' सचिन देव ब्रिज, तथापि, किशोर कुमार यांनी आत्मविश्वासाने, आत्म-भोगाच्या आवाजावर कठोरपणे कठोरपणे विचार केल्यानंतर. सचिन देव बर्मन कुमार आपल्याला सांगतात, आपण आपले अनुसरण करू इच्छित आहात. जिथे जिथे मुयकर मरीन सेस गाना नाही … जेणेकरून हे धक्के त्यांना सांगत आहेत.

मनात नेहमी येते की, भेटी कशा आणि कुठे घडाव्या हे नियती ठरवत असते. आत्ता हा लेख हातावेगळा करताना आठवलेली एक गमतीची गोष्ट म्हणजे, सचिन तेंडुलकर या आपल्या आवडत्या क्रिकेटवीराचे सचिन हे नाव ठेवले गेले ते सचिनचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर हे सचिन देव बर्मन यांचे चाहते असल्याने.

[email protected]

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.