सलमान खान याने 'दम बिर्यानी' या पॉडकास्टमध्ये अनेक खुलासे केले आहे. सलमानने या पॉडकास्टमध्ये एक भयानक किस्सा शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने मरता-मरता कसा जीव वाचला याचा अनुभव शेअर केला आहे.
मुलाखतीमध्ये सलमान खान कानाला हेडफोन लावण्याबद्दल बोलत होते. त्यावेळी त्यांना कानाला हेडफोन लावणं किती चुकीचं असल्याचं सांगितलं. तसंच आजूबाजूला काय चालू आहे, याचा अंदाज घेण्यासाठी कान मोकळा ठेवावा असा सल्लाही त्याने बोलताना दिला.
सलमान म्हणाला की, 'आम्ही श्रीलंकेहून आईफा सोहळ्यावरुन येत असताना खूप मजा मस्ती करत होतो. त्यावेळी अचानक विमा टर्बुलेंसमध्ये आलं आणि गडगड करायला लागलं. आम्हाला वाटलं हे सगळं नॉर्मल असेल. पण पुन्हा तसाच आवाज येऊ लागला. तब्बल 45 मिनिटं आवाज सुरु होता. सगळे लोक शांत बसले होते.'
पुढे बोलताना सलमान म्हणाला की, 'माझ्या सोबत सोहेल देखील होता. एकाच कुटुंबातील आम्ही दोघं होतो. मी सोहेलकडे कडे पाहिलं तर तो कानात हेडफोन घालून निवांत झोपला होता. मी एअरहोस्टेस्टकडे पाहिलं तर ती प्रार्थना करत होती. तेव्हा मला कळालं की, काहीतरी गडबड आहे. पायलटही त्रस्त झाला होता. ऑक्सिजन मास्कही उघडण्यात आले होते. ते 45 मिनिट आयुष्यातील सर्वात भयानक होते. एखाद्या सिनेमाप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली होती.'
मुलाखतीत बोलताना सलमान म्हणाला की, जेव्हा विमान सुरुळीत सुरु झाले, तेव्हा आम्ही शांत झालो. विमान लँड होईपर्यंत एकही शब्द आमच्या तोंडातून निघाला नाही. त्यामुळे तो दिवस कधीही न विसरण्यासारखा होता असं सलमान म्हणाला.