राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोड्या करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहे. एक हॉटेल फोडून सामानाची चोरी केली आहे. राहुरी पोलिस ठाण्यात घरफोडीचे दोन व हॉटेल फोडल्याचे एक असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
वर्षा शेजूळ (वय ३५, रा. राहुरी फॅक्टरी, नर्सिंग होम कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होम कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सव्वा दोन तोळे सोन्याची दागिने व चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा २६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
शिवाजी धाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, कपाटातील सोन्याची अंगठी, कानातील डूल, रिंगा असे १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक मोबाईल व दोन हजार रुपये असा एकूण मुद्देमाल चोरी झाल्याचे लक्षात आले. अजित वने (वय २७, रा. गणेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, शेजारील जगदंब हॉटेलमधील भांड्याचा सेट, गॅस, शेगडी, फ्रिज तसेच डिपफ्रीज असे सर्व साहित्य चोरुन नेले आहे.