इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करून सोडलं. पण मधल्या षटकात काही विकेट झटपट गेल्याने धावांचा वेग मंदावला. भारताने 50 षटकात सर्व गडी गमवून 356 धावा केल्या आणि विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली, पण कर्णधार रोहित शर्माने हा निर्णय मनासारखा झाल्याचं सांगितलं. भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात आली होती. मागच्या सामन्यात शतकी खेळी केल्याने रोहित शर्माकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण अवघी 1 धाव करून तंबूत परतला. त्यामुळे टीम इंडियावर दबाव वाढला होता. यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीचं चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी शतक आल्याने चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. विराटने 55 चेंडूत 52 धावा करून बाद झाला. त्यानंतर शुबमन गिलला श्रेयस अय्यरची साथ मिळाली.
शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. तर शुबमन गिलने 102 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. शुबमन गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आपल्या फलंदाजीचं दर्शन घडवून दिलं. त्याने 64 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल राशीद सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकात 64 धावा देत 4 गडी बाद केले.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग.
इंग्लंड (खेळणारा इलेव्हन): फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, टॉम बँटन, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद.