तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टार मराठी चित्रपट 'देवमाणूस' ची (Devmanus) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आलेत. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) , रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके असे दिग्गज कलाकार आहेत. पोस्टरमधून चाहत्यांना सिनेमात असलेल्या त्यांच्या प्रभावशाली स्वरूपाची एक झलक देतात.
चित्रपटाचे चाहते टीझरची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. रिलीझ झालेल्या ह्या पोस्टर्स मध्ये आपण चित्रपटाच्या मुख्य पात्रांचे अतिशय मोहक फर्स्ट लूक पाहू शकतो. अभिनेते ह्यांचा खूपच साधा पण इंटेन्स लूक आपल्याला दिसून येतो. त्यांची भेदक नजर त्यांच्या या भूमिकेची गंभीरता सांगते. अभिनेत्री रेणुका शहाणे ह्यांचा मायाळू, सरळ देखावा आणि मनमोहक लूक लक्ष वेधून घेणारा आहे. तर भावे ह्यांना पोलिसांच्या हटके भूमिकेत पाहू शकतो.
'देवमाणूस' चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके त्याच्या हसण्याने सिनेमाचं आणि त्याच्या भूमिकेचे रहस्य वाढवतो. लव फिल्म्स प्रस्तुत, 'देवमाणूस' या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर ह्यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. 'देवमाणूस' चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.